पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/98

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


सारे रान - इंद्रजित भालेराव जनशक्ती वाचक चळवळ, समर्थनगर, औरंगाबाद ४३१००१ प्रकाशन - २०१६, पृष्ठे - ४४० किंमत - रु.५००/-



सारे रान

 शेतकवी इंद्रजित भालेराव हा कोल्हापूरने महाराष्ट्राला दिलेला नजराणा! त्यांचा पहिला कविता संग्रह 'पीकपाणी' सन १९८९ ला अनिल मेहतांनी प्रकाशित केला होता. तेव्हापासून ते आज अखेर 'आम्ही काबाडाचे धनी', 'दूर राहिला गाव', 'कुळंबिणीची कहाणी', 'गावाकडं', 'पेरा', 'टाहो', 'मुलूख माझा', 'वेचलेल्या कविता', 'भूमीचे मार्दव' या सारख्यां काव्यसंग्रहातून ज्या कविता प्रकाशित झाल्या त्या श्रीकांत उमरीकरांनी एकत्र करून प्रकाशित केल्या आहेत. 'सारे रान' या शीर्षकातून ती समग्रता सूचित होते. हे शीर्षक साने गुरुजींच्या एका कवितेच्या ओळीतलं. 'आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान। शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण।।' या ओळी स्वातंत्र्यपूर्व काळात लिहिलेल्या. त्यापूर्वी सुमारे पन्नास एक वर्षे आधी महात्मा फुले यांनी 'शेतकऱ्याचा आसूड' मध्ये शेतकऱ्यांच्या शोषणाचे केलेले हृदयद्रावक वर्णन आढळते. गेल्या दीडशे वर्षांत अनेक समाजधुरीण, साहित्यिक, राजकारणी यांनी शेतकऱ्यांबद्दल काया, वाचा, मने प्रयत्न करूनही शेतकऱ्यांचे दैन्य काही सरत नाही. त्या साऱ्या शेतसारा, सातबारा, शेतसंस्कृती, पीक, पाणी, कर्ज, आत्महत्या

साऱ्यांचं प्रतिबिंब म्हणजे 'सारे रान' मधील कविता! त्या वाचत असताना

वाचावे असे काही/९७