पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/65

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


ग्रंथगप्पा - शरद गोगटे मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, ठाणे पृ. १६०, किंमत - २००/- प्रकाशन - २०१६



ग्रंथगप्पा

 पुस्तकाचं नाव 'ग्रंथगप्पा' असं हलकं-फुलकं असलं, तरी पुस्तक मात्र मराठी ग्रंथव्यवहारावर क्ष किरण टाकणारे आहे. ते एका मराठी ग्रंथव्यवहार जाणकाराने लिहिले आहे. त्यांचे नाव आहे, शरद गोगटे. त्यांनी यापूर्वी 'मराठी ग्रंथप्रकाशनाची २०० वर्षे' नावाचा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक संदर्भग्रंथ सिद्ध केला आहे. तो ग्रंथ लिहीत असताना मराठी पुस्तकांचा प्रारंभ, निर्मिती, विकास यासंदर्भात विपुल माहिती त्यांच्या हाती आली. सर्व माहिती ते उपरोक्त संदर्भ पुस्तकात देऊ शकले नाहीत. म्हणून मग त्यांनी 'ललित' मासिकात 'ग्रंथगप्पा' सदर सुरू केलं. त्या सदराचं हे ग्रंथरूप होय.

 या पुस्तकाचे तीन भाग आहेत. (१) ग्रंथ : रूप व अंतरंग. (२) ग्रंथव्यवहार (३) ग्रंथोपजीवी. या तीन भागात एकूण २८ लेख आहेत. प्रत्येक लेख म्हणजे संदर्भ, माहिती, इतिहासाचा खजिनाच! म्हणजे मी तुम्हाला असे विचारले की मराठीला सचित्र मुखपृष्ठ लाभलेलं पहिलं पुस्तक कोणतं? तर ते चोखंदळ वाचक व चिकित्सक अभ्यासकाला पण सांगता येणे कठीण. 'ग्रंथगप्पा'तून कळते की १९३३ साली पहिल्यांदा मराठी पुस्तकाच्या मुखपृष्ठावर चित्र आले. तोवर म्हणजे सन १८०५ मध्ये

वाचावे असे काही/६४