पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/64

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सिनसिनाटी शहराच्या प्राणीसंग्रहालयात करण्यात आली. ती मादी त्याला इतकी आवडली की तिथे त्याने ३३ ड्रॅगनची पिल्ले जन्माला घातली. त्यांचे काय करायचे हा तेथील परराष्ट्र मंत्रालयापुढे यक्षप्रश्न उभा राहिला. कारण अशा भेटी राजशिष्टाचार म्हणून जपाव्याच लागतात. इजिप्तच्या सुलतानाने इटलीच्या राजकुमाराला चक्क जिराफच भेट दिला, तोही समारंभपूर्वक भर दरबारात!

 १९९६ साली जपानला गेलेल्या भारतीय शिष्टमंडळात मी सदस्य होतो. टोकियोच्या पहिल्या राजकीय भोजनात माझ्या ताटातले सर्व पदार्थ मांसाहारी होते. मी तिथल्या राजशिष्टाचार अधिकाऱ्यांना शाकाहारी असल्याचे समजावत होतो अर्थातच दुभाषामार्फत. ते अधिकारी पर्यायी पदार्थ म्हणून मांसाहारी पदार्थच सुचवत राहिले. शेवटी माझ्या लक्षात आलेली गोष्ट म्हणजे, जपानला शाकाहार ही कल्पनाच माहीत नव्हती.

 दै. सकाळ चे प्रतिनिधी विजय नाईक यांचे हे पुस्तक म्हणजे जगप्रवासच! पूर्वी भारतीय परराष्ट्र खात्यात अनेक महाराष्ट्र अधिकारी असत. आता त्या आघाडीवर आपला ज्ञानेश्वर मुळे वगळता आपली पिछेहाट झाल्याचे लेखकाचे शल्य महाराष्ट्रीय तरुणांना आव्हान होय. असे असले, तरी जगाच्या क्षितिजावरचा आजचा भारत म्हणजे उगवता तारा आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

◼◼

वाचावे असे काही/६३