पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/63

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

'तिसरा डोळा' म्हणूनही हा विभाग कार्य करीत असतो. या विभागाला दोन 'तिसरे डोळे' असतात. दुसरा 'तिसरा डोळा' जगभर उपग्रहासारखा फिरत असतो. म्हणून आपला देश सुरक्षित असतो. प्रत्येक परदेश एकाच वेळी मित्र व शत्रू समजून कार्य करण्यावर या विभागाची कार्यकुशलता जोखली जाते.

 हे पुस्तक अनेक रोचक, खोचक माहिती, घटना, प्रसंगाचा खजिना म्हणून महत्वाचे. वाचक एकदा का वाचू लागला की तो 'शेरलॉक होम्स', बाबूराव अर्नाळकरांच्या 'झुंझारकथा' प्रमाणे पुस्तक एक हाती वाचून संपवतो. यशवंतराव चव्हाण परराष्ट्र मंत्री असताना १९७५ साली पेरू देशाची राजधानी लिमा येथे गेले होते. तेथील राजवाड्यात तेथील राष्ट्राध्यक्ष जुऑन व्हेलॅस्को यांच्याशी भारतीय शिष्टमंडळाची चर्चा सुरू होती. एका फ्रेंच पत्रकाराने यशवंतराव चव्हाण यांना चिठ्ठी पाठवली. 'देशात लष्करी उठाव झाला आहे व राजवाडा लष्कराने वेढला आहे. राष्ट्राध्यक्ष मात्र शांत होते कारण तिथे लष्करी उठाव नेहमीचाच होत होता. 'तुम्ही बोलणी पूर्ण करा' म्हणून राष्ट्राध्यक्ष निघून गेले. उठाव शांततापूर्ण होता. बाहेर सारे पूर्ववत होते. फक्त राष्ट्राध्यक्ष नवे झाले होते. त्यातच इथियोपियाचे अध्यक्ष राजे हेले सेलासी यांच्या निधनाची वार्ता येऊन थडकली. दोन्ही घटनांच्या प्रतिक्रिया देत यशवंतराव चव्हाण स्वदेशी सुखरूप पोहोचले. आपल्याला राजकारण्यांचा मुकुट, मानमरातब दिसतो, जोखीम अशा प्रसंगातून लक्षात येते.

 पंतप्रधान वा राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी असो वा दफनविधी वा अंत्यसंस्कार, त्यास देशोदेशीचे राष्ट्रप्रमुख उपस्थित असतात. अशावेळी गांभीर्य पाळणं फार महत्वाचं असतं. पण त्याचवेळी मोठ्या संख्येने आलेल्या राष्ट्रप्रमुखांची बैठक व्यवस्था करणे मोठी डोकेदुखी असते. सर्व औपचारिक असलं, तरी रोज एकमेकांचे शत्रू समजले जाणारे राष्ट्रप्रमुख एकमेकांस हस्तांदोलन करतात ते उपचार म्हणून. असे फोटो वृत्तपत्रात लक्षवेधी ठरतात.

 राष्ट्रप्रमुख विदेशी दौऱ्यावर जातात तेव्हा त्यांना राज शिष्टाचाराचा भाग म्हणून भेटी दिल्या जातात. पूर्वी पक्षी, प्राणी भेट दिले जायचे. इंडोनेशियाच्या अध्यक्षांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांना आपल्या कमोडो बेटावर सापडणारा जगातला सर्वांत मोठा सरपटणारा प्राणी ड्रॅगन भेट म्हणून दिला. तो त्यांनी व्हाईट हाऊसच्या प्राणीसंग्रहालयात ठेवला. तेथील कुत्र्यांशी त्याचे पटेना. म्हणून त्याची रवानगी मादी ड्रॅगन असलेल्या

वाचावे असे काही/६२