पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/38

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सध्या जागतिक क्रमवारीत अव्वल असणाऱ्या हॉर्वर्ड विद्यापीठात अध्यापन करणाऱ्या डॉ. अमर्त्य सेन यांना पाठविले होते. ते वाचून आपला अभिप्राय देणारे डॉ. अमर्त्य सेन यांनी त्यात म्हटलं आहे की, 'मी वाचलेल्या पुस्तकांपैकी हे सर्वश्रेष्ठ पुस्तक होय. ते हादरवून सोडणारे, प्रभावी तर आहेच, शिवाय हृदयस्पर्शीही!'

 हे पुस्तक अरुण शौरी यांच्या जीवनातील एका घटनेचे सविस्तर विवेचन आहे. त्याला वास्तवाचे कोंदण आहे नि चिंतनाची झालरही। शौरींचं मूळ कुटुंब पाकिस्तानातले. भारत-पाकिस्तान विभाजन सन १९४७ मध्ये झाले, तेव्हा जे हजारो लोक भारताच्या ओढीने परतले त्यापैकी हे एक. अरुण शौरी प्रतिकूल परिस्थितीत शिकत मोठे झाले. विवाह झाला. संसाराची नऊ वर्षे स्वर्ग सुखाची गेली. बाळाच्या ओढीने त्यांनी एका जीवाला जन्म दिला. बाळ सातव्या महिन्यातच जन्मले. खरे तर नैसर्गिक जन्मापूर्वीच बाळाला डॉक्टरांच्या सल्ल्याने मदतपूर्व जन्माला घालावे लागले. जन्मलेले बाळ अवघे चार पौंडांचे असते. जन्मजात यातनांच्या गर्तेत, आवर्तनात सापडलेले हे बाळ वाचवण्यासाठी त्याला काचेच्या पेटीत ठेवण्यात येते. त्याला वाचवण्यासाठी हाताची शीर सापडत नाही म्हणून जन्मजात बाळास डोक्यात सुया खोचल्या जातात. बाळाची साखरेची पातळी अस्थिर म्हणून रक्त चढवले जाते. असे महिनाभर जीव वाचवण्याच्या पालकांचा अटापिटा डॉक्टरांनाही असह्य होतो. एक हितचिंतक या पालकांना एका क्षणी कठोर सत्य सांगून मोकळे होतात... 'हे मूल तुमचे आयुष्य संपवेल... पूर्ण आयुष्य! तुम्हाला हा असा मुलगा जगावा असे गांभीर्याने वाटते का?' बाळाची आजी निक्षून सांगती होते, असे काही नाही, आता अपंग मुलेसुद्धा अगदी सक्षम आयुष्य जगतात. बाळाला जीवदान मिळते खरे पण ते त्याला नि पालकांना एक जीवघेणे आयुष्य बहाल करते. पुढे बाळाला मेंदूचा पक्षाघात होतो. तो सात वर्षाचा होतो. तर शाळेचा यक्षप्रश्न उभारतो. स्पॅस्टिक (प्लॅस्टिक नव्हे) मुलांच्या शाळेचा शोध सुरू होतो. शाळा मिळते एकदाची. पण पालकांसाठी 'रात्रंदिनी युद्धाचा प्रसंग'. बाळाला आई रोज गाडीतून घेऊन जायची. एकदा त्यांच्या गाडीला एका जीपने उडवले. बाळ आणि आई दोन्ही जखमी झाले. सदर भीषण अपघातात बाळाच्या आईचे दोन्ही खांदे धरले ते कायमचेच. पुढे त्याचं रुपांतर पार्किन्सनमध्ये झाले. तेही बेचाळीसाव्या वर्षी. आता अरूण शौरी घरातले 'सर्व सेवक' झाले. कल्पनासुद्धा करता येणार नाही असे असह्य आघात

वाचावे असे काही/३७