पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/37

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


कळेल का 'त्याला' आईचं मन? अरुण शौरी. भाषांतर - सुप्रिया वकील मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे प्रकाशन २०१४ पृ. ३७८ मूल्य रु.३९०/-



कळेल का 'त्याला' आईचे मन?

अरूण शौरी हे 'इंडियन एक्सप्रेस' या इंग्रजी दैनिकाचे कार्यकारी संपादक होते. तत्पूर्वी ते वर्ल्ड बँकेत अमेरिकेमध्ये उच्च पदावर कार्यरत होते. इंदिरा गांधींनी पुकारलेल्या आणिबाणीने अस्वस्थ होऊन 'भारतात आलेला हा संवेदनशील मनुष्य. तो इथे येतो नि भारताच्या दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्यातून (आणिबाणी) लोकशाहीची पुनर्स्थापना करतो. त्याबद्दल त्यांना 'जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य प्रणेता' म्हणून गौरविण्यात येतं. मॅगसेसे अ‍ॅवॉर्ड, पद्मभूषण प्राप्त अरूण शौरी अटलबिहारी वाजपेयी सरकारमधील कार्यक्षम मंत्र्यांपैकी एक होते. अनेक ग्रंथांचे कर्ते. पैकी काही गाजले. तर काही वादग्रस्तही ठरले.

 त्यांचे अलीकडे सन २००९ मध्ये लिहिलेले एक इंग्रजी पुस्तक आहे. 'डज ही नो अ मदर्स हार्ट?' या इंग्रजी पुस्तकाचे मराठी भाषांतर 'कळेल का 'त्याला' आईचं मन?' उपलब्ध आहे. सुप्रिया वकील यांनी मूळ हृदयस्पर्शी असलेल्या विषयाचे संवेदनक्षम भाषांतर करून ते अरुण शौरीच सारे सांगत आहेत अशा प्रथमपुरुषी जाणिवेचे बनवले आहे. हे मूळ इंग्रजी पुस्तक अरुण शौरींनी अर्थशास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळविणाऱ्या व

वाचावे असे काही/३६