पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/27

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सांगतील ते नि तसे कपडे माणेकशॉ घालते झाले. त्या क्षणी तर फिल्ड मार्शल गौतम राजाध्यक्षच होते, हे वेगळे सांगायला नको. अशी पर्वणी म्हणजे गौतम राजाध्यक्षांना नेहमीच मनातील शंका दूर करायची संधी वाटत आली आहे. त्या वेळी अशी कुणकुण होती की इंदिरा गांधी नि माणेकशॉ यांचे पटायचे नाही. गौतम राजाध्यक्षांनी शंका विचारल्यानंतर माणेकशॉनी केलेला खुलासा मुळातच वाचायला हवा. अफवा होती की माणेकशॉ देशावर मिलिटरी हुकुमत आणणार आहेत. माणेकशॉना पंतप्रधान इंदिरा गांधी- बोलवतात - अर्थात जाब विचारण्यासाठी. माणेकशॉ विनंती करतात ... तुम्ही माझ्या अधिकारात हस्तक्षेप करू नये. मी तुमच्या सत्तेत हस्तक्षेप करणार नाही. कोणताही देश वाचतो, घडतो ते हक्क आणि कर्तव्यांच्या सीमारेषांवर.' मोठी माणसं त्या ओळखतात. म्हणून ती मोठी असतात... ते त्यांचे चेहरे समजावतात, आणि संस्कार, संस्कृतीही.

 सचिन तेंडुलकरांची निष्पापता, माधुरी दीक्षितचं स्पंजाप्रमाणे समजून घेणं, एम्. एफ. हुसेन यांना फकीर व्हावंसं वाटणं, शबाना आझमीचे आयुष्यभरचे सारे फोटो फक्त गौतम राजाध्यक्षांचेच- काय काय गमती असतात आयुष्यात अन् ही सारी कमाल असते फक्त कॅमेरा नि लेन्सची! पण मी सांगू तुम्हाला त्याच्या पलीकडचा चित्रकाराच्या आतला माणूस, मित्र, मानसशास्त्रज्ञ, कलाकार, संपादक, लेखक, कल्पक अशा कितीतरी छटा हे पुस्तक समजावतं. गौतम राजाध्यक्ष एकदा रतन टाटांचे फोटो काढायला गेले. ते नाखूष. मनासारखे फोटोच निघेनात. लक्षात येतं की हा माणूस प्राण्यांबरोबर खुलतो. ते टाटांना कुत्र्याशी नेहमीसारखे खेळत राहायला सांगतात. फोटो मनासारखे मिळून जातात. टीना मुनीम साध्या घरची षोडशवर्षीय तरुणी. 'क्लोजअप'च्या जाहिरात फोटोत ती क्लिक होते नि 'टीन क्वीन' होते आणि म्हणून नंतर अंबानी बनते. फोटो काय करीत नाही?

 लिथो साइजच्या आर्ट पेपरवर छापलेले हे ३५० पानांचे देखणे पुस्तक सुमारे पासष्ट सेलेब्रेटीजचे हे सचित्र चरित्रच! खरं तर कॉफी टेबल बुक हे चाळायसाठी म्हणून तयार केलं जातं. पण गौतम राजाध्यक्षांनी जीवनाच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा यात घेतलेला धांडोळा वाचताना लक्षात येतं की या माणसांमध्ये असं काही एक रसायन भरलेलं असतं, ते त्याला मोठं करतं. व्ही. शांतारामांचे सर्व चित्रपट कलात्मक का होते? विजया मेहतांच्या अभिनयाचे रहस्य काय? शेखर कपूर सी. ए. असताना चित्रपट सृष्टीत

वाचावे असे काही/२६