पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/28

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कोणत्या पॅशनने आला? तीनही खान (सलमान, शाहरूख, अमीर) एक असूनही वेगळे कसे? हे सारं कुतूहल निर्माण करणारं नि शमवणारं हे पुस्तक वाचणं, पाहणं हा एक कलात्मक समाधीचा भाग आहे. हे पुस्तक मिटून मिटत नाही. ते तुमचा पिच्छा करतं. तुम्हाला वाचक म्हणून गदागदा हलवतं. ते तुमच्या आतील रसिकाचं खोदकाम, उत्खनन करतं. समजावतं. जगात लीलया काहीच मिळत नाही. जी माणसं निकराच्या क्षणी स्वतःचं जीवन कौशल्य पणाला लावतात, जे आत्ममग्न समाधीत स्वतःस गाडून घेतात, तेच पद, प्रतिष्ठा, प्रसिद्धी, पैसा, कला प्राप्त करतात. जगात कुणालाच काही नशिबानं मिळत नाही. जे मिळते ते तुमच्या प्रयत्नाचेच फळ असते.

◼◼

वाचावे असे काही/२७