पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/25

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चेहरे - गौतम राजाध्यक्ष प्रकाशक, व्हॅल्युएबल ग्रुप, मुंबई प्रकाशन- २०१० पृ. ३४५, (खासगी वितरणासाठी)


चेहरे

 चित्रं पाहायची असतात की वाचायची असतात, असा प्रश्न कुणी आपणास केला, तर आपण विचारण्याला वेड्यात काढू. सर्व सामान्य माणसाचं उत्तर हेच असणार की चित्रं पाहायची असतात. पण मी अनुभवाने सांगेन, चित्रं वाचता येतात. चित्र वाचता येणं तुमच्या विचार, तर्क, बुद्धिमत्तेची कसोटी असते खरी. चित्रपट, पत्रकारिता, जाहिरात क्षेत्रात आपल्या कॅमेऱ्याची कमाल दाखवणारा एक छायाचित्रकार होता. गौतम राजाध्यक्ष त्याचं नाव. या माणसाचं एक सचित्र पुस्तक आहे. 'चेहरे' असं त्याचं शीर्षक आहे. परत तोच प्रश्न मी विचारीन - चेहरे पहायचे असतात की वाचायचे? याचं उत्तर देणारं हे पुस्तक.

 गौतम राजाध्यक्ष मुंबईच्या सेंट झेविअर्स कॉलेजमध्ये शिकले. शिकत असताना त्यांचे वर्गमित्र, मैत्रिणी कोण तर शबाना आझमी, कविता कृष्णमूर्ती, नितीन मुकेश, पंकज उधास, प्रीती सागर, फारूख शेख. शिकत असताना त्यांचे कॉलेज गायन, नाटक, चित्रकला सर्व क्षेत्रातील पारितोषिक पटकावत असायचे. पारितोषिकं मीनाकुमारीच्या हस्ते मिळायचा तो काळ! कॉलेज संपलं तसं गौतम राजाध्यक्ष 'लिंटास' नावाच्या प्रख्यात जाहिरात कंपनीत छायाचित्रकार म्हणून रुजू झाले. शोभा डे मुळे त्यांना चित्रपट विषयक

वाचावे असे काही/२४