पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/24

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर दया पवार, मेघना पेठे, प्रा. मे. पु. रेगे, बाबा कदम, रवींद्र पिंगे, कुमार केतकर, दिनकर रायकर, निळू फुले, आर. आर. पाटील (आबा), सुरेखा पुणेकर, देव आनंद, रामदास भटकळ, इंद्रजित भालेराव, सदानंद देशमुख, डॉ. सदानंद मोरे प्रभृती मान्यवरांचे लेख वाचायला मिळतात आणि आपले जगच बदलून जाते. आपले जीवन बदलायचे तर बाह्य जग समजून घ्यायला हवेच.

 माणसे आयुष्यात दोन अंगांनी समृद्ध, प्रगल्भ होत असतात. पैकी एक असतो स्वानुभव. दुसरी गोष्ट असते दुसऱ्याचे जीवनानुभव. बऱ्याचदा आपण आपले सुखच दुःख म्हणून गोंजारत कुढत जगतो. दलित, वंचितांचे जीवनानुभव वाचकास अनुभवाच्या पातळीवर हादरवून सोडत असतात. ही असते लेखनाची ताकद. मराठी आत्मकथनात्मक साहित्य भारतीय भाषातील श्रेष्ठ मानले जात असले, तरी जगातील भाषांतील गाजलेली आत्मकथनेच खरा साहित्यिक ऐवज. 'द डायरी ऑफ यंग गर्ल' (अ‍ॅना फ्रैंक), 'लाँग वॉक टू फ्रिडम' (नेल्सन मंडेला), 'माय लाइफ' (इझाडोरा डंकन), "जखन छोटो चिलो (सत्यजीत राय), 'कन्फेशन' (लिओ टॉलस्टॉय), 'द वर्ड' (ज्यां पां सार्त्र), 'अप फ्रॉम स्लेव्हरी' (बुकर टी वॉशिंग्टन) वाचली नसली तरी मिळवून वाचा. यातील अनेकांचे मराठी, हिंदी, अनुवाद उपलब्ध आहे. लक्षात ठेवा, वाचनाने जग बदलते आणि माणूसही!

◼◼

वाचावे असे काही/२३