पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/161

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

समारोप सायोनारा

 दैनिक 'लोकमत'च्या वाचकांसाठी मी 'वाचावे असे काही' लिहावे ही कल्पना संपादकांची. सन २०१७ उगवून जानेवारी महिना लोटत आलेला होता, जेव्हा ही चर्चा फोनवर झाली. १० फेब्रुवारीपासून हे सदर मी नियमित लिहिले तरी ते नियमित प्रकाशित होऊ शकले नाही. त्यामुळे सुमारे चाळीस पुस्तकेच वाचकांप्रत पोहोचू शकली. मी कोल्हापुरी असलो तरी ब्रह्मपुरी राहातो. माणसाचं राहणं, जगणं आता आभासी झालंय खरं! लेखक, संपादक, वाचक एकमेकांना भेटत, दिसत, बोलत नसले तरी जग चालू आहे. मी जमिनीवर राहात असलो, तरी माझा निवास आभासी जगात अधिक असतो. माणूस ज्या गावात, शहरात राहतो त्या समाजजीवनाशी त्याचा संबंध त्याच्या निवडीवर अवलंबून असतो. म्हणजे असे की तो म्हटला तर सामाजिक अन्यथा व्यक्ती.

अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, बुकआर्मी, बुकीश, आयड्रीमबुक, लायब्ररी २.०, लायब्ररी किंग रिडगीक, शेल्फरी ही अशी संकेतस्थळे आहेत की ती जगातील पुस्तकांचं बदलतं जग तुम्हाला समजावतात की मी या जगात राहतो. शिवाय गुडरिडर, ॲकॅडमिया एज्युकेशन, खान ॲकॅडमी ही माझी

वाचावे असे काही/१६०