पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/153

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शतकाची विचारशैली (खंड - ४) संपादक - डॉ. रमेश धोंगडे प्रकाशन - दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. शनिवार पेठ, पुणे - ४११०३० प्रकाशन - २०१७ पृष्ठे - ८४८, किंमत - १०००/-



शतकाची विचारशैली (खंड - ४)

 कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून सन २००९ ते २०१२ या कालखंडात कार्य केलेले लक्ष्मीकांत देशमुख हे पुढील वर्षी बडोदा (गुजरात) येथे संपन्न होणाऱ्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. सदर संमेलन सुरू झाल्यापासून (सन १८७८) संमेलनाध्यक्ष महाराष्ट्र समाजास उद्देशून अध्यक्षीय भाषण करत आले आहेत. मराठी भाषा व साहित्याबद्दल चिंता नि चिंतन व्यक्त करणारी ही भाषणे मराठी साहित्याच्या इतिहासातील महत्त्वाची पाने ठरत आली आहेत. या भाषणांना गंभीरपणे घेऊन त्यावर वेळोवेळी वाद-विवाद, चर्चासत्रे, संशोधन प्रबंध, समीक्षा ग्रंथ इत्यादीद्वारे विचार मंथन होत आले आहे. "शतकाची विचारशैली' नावाने संमेलनाध्यक्षांच्या भाषणांची चिकित्सा करणारे तीन खंड (प्रत्येकी सुमारे ७५० पृष्ठे) सन २००२ पासून क्रमशः प्रकाशित होत आले आहेत. त्यात सुमारे ७५ अध्यक्षीय भाषणांची समीक्षा करण्यात आली होती.

 शतकाची विचारशैली (खण्ड - ४) चे प्रकाशन या वर्षी झाले आहे. दिलीपराज प्रकाशन, पुणे यांनी हे खंड प्रकाशित केले असून त्याचे संपादन डॉ. रमेश धोंगडे यांनी केले आहे. चौथ्या खंडात एकविसाव्या शतकात

वाचावे असे काही/१५२