पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/14

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विचार, साहित्य समीक्षा, परीक्षण इत्यादीची निर्मिती, सृजन आता परिपाठ होऊन गेला आहे. वाचन दोष दूर करणे विज्ञानामुळे शक्य झाले आहे. प्रत्येक व्यक्तीचा वाचन पट वेगळा असतो. म्हणजे एका दृष्टिक्षेपात २.५ ते ३.५ सें.मी. चा मजकूर आपण सर्वसाधारणपणे वाचू शकतो. हा आवाका तंत्र समजून घेऊन वाचल्याने वाढवणे शक्य असते. वाचनातून आपण ऐकणे, बोलणे, लिहिणे, मनन, चिंतन इत्यादी क्रिया प्रगत नि प्रगल्भ करू शकतो. आधुनिक काळात दृक्-श्राव्य साधनांच्या वापरामुळे हे शक्य झाले आहे. मोबाईल, किंडल ही नवी वाचन साधने होत. कॅसेट्स, सीडीज, टेपरेकॉर्डर, टी.व्ही. संगणक, सॉफ्टवेअर इत्यादीतून वाचन व्याप्ती (Scope), वाचन गती (Speed), वाचनपटल (Screen), शब्दसंख्या वाढवणे आता शक्य झाले आहे. शिवाय एकाग्रतेचा वेळ (Span of Attention) वाढवणे आता शक्य झाले आहे. वाचन एकाग्रता, रसग्रहण, आकलन इ.च्या चाचण्या आज प्रयोगातून सिद्ध झाल्या आहेत. वाचन दोष निराकरणाचे उपायही संशोधकांनी शोधून काढले आहेत. दर मिनिटाला वाचल्या जाणाऱ्या शब्द, पृष्ठ संख्येवरून गतिनिश्चिती व गतिवर्धन आज शक्य झाले आहे. आदर्श वाचनाचा विचार होऊन डोळे व पुस्तकातील अंतर, बैठक व्यवस्था, प्रकाश योजना एकाग्रता विचलित करणारे घटक, एकाग्रता टिकविणारे वातावरण, वायुविजन इत्यादीचा आता सूक्ष्म अभ्यास झाला आहे. माणूस दर मिनिटाला १०० ते १५० शब्द वाचू शकतो. यातून वाचन क्षमतेवर संशोधन, प्रयोग झाले आहेत. वाचन आनंददायी, सर्जनात्मक, रसपूर्ण व्हावे यासाठीचा विचारही संशोधनातून पुढे आला आहे. या सर्वांतून वाचन विज्ञान विकसित झाले असून रोज त्यात संशोधन, प्रयोगाची, साहित्य, साधनांची भर पडत ते नित्य अत्याधुनिक व प्रगत बनते आहे.

 वाचन म्हणजे लिखित अक्षरांचा वाच्य बोध होय. लेखनाचे वाच्य रूप वाचनातून साकारते. मौन, मनन, चिंतन ही वाचनाची इतिश्री असते. अक्षरं असतात आकारयुक्त चिन्ह. त्या चिन्हांचे उच्चारण वा ध्वनीरूप म्हणजे वाचन. वाचन ही एक बोध प्रक्रिया असते. पाहणे, ऐकणे, उच्चारण, आकलन, विश्लेषणातून ती संपृक्त नि समृद्ध होते. वाचन ही संकट, प्रश्ने सोडविण्याची मार्गदर्शक वाट असते. जागतिकीकरण, माहिती व तंत्रज्ञान विकास यातून माणसाचं पूर्वापार प्रचलित सांस्कृतिक जीवन बदलून गेलं. या बदलाचा मोठा परिणाम वाचन प्रक्रियेवर झाला आहे. विशेषतः दृक्-श्राव्य साधनांमुळे वाचनाचे स्वरूप बदलून गेले. पाहणं नि ऐकणं वाचन

वाचावे असे काही/१३