पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/131

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मंटो की श्रेष्ठ कहानियाँ - संपादक : देवेंद्र इस्सर इंद्रप्रस्थ प्रकाशन, कृष्णनगर, दिल्ली - ११००५१ प्रकाशन - १९९१, पृष्ठे - १९३, किंमत - ७५/-



मंटो की श्रेष्ठ कहानियाँ

 सादत हसन मंटो हा विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील श्रेष्ठ उर्दू कथाकार. त्यांच्या सर्वश्रेष्ठ कथांचा संग्रह आहे, 'मंटो की श्रेष्ठ कहानियाँ'. या संग्रहाचं संपादन केले आहे उर्दू भाषेचे प्रसिद्ध समीक्षक देवेंद्र इस्सर यांनी. सदर संग्रहात मंटोच्या २२ कथा आहेत. सर्वच उल्लेखनीय असल्या तरी तमाशा, नया कानून, टोबा टेकसिंह, धुआँ, हतक, काली सलवार, ठंडा गोश्त, खोल दो या अत्यंत गाजलेल्या नि वाचनीय कथा आहेत. तुम्ही चांगले वाचक असाल तर तुम्हाला मंटो माहीत असायलाच हवा.

 मंटोचा जन्म समराला गावी ११ मे, १९१२ ला झाला. हे गाव पूर्व पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यातलं. मंटोचे पूर्वज काश्मिरी. त्याचं शिक्षण, राहणं अमृतसर, अलीगढ, लाहोर, दिल्ली, मुंबईत झालं. त्याच्या जीवनाचा पूर्वार्ध भारतात तर उत्तरार्ध पाकिस्तानमध्ये गेला. स्वातंत्र्यपूर्व काळात तो भारतात होता. फाळणीनंतर पाकिस्तानला गेला. भारतात असताना तो आकाशवाणीमध्ये नाटककार म्हणून नोकरीस होता. अनेक वृत्तपत्रे, मासिकांत त्यांनी उमेदवारी केली असली, तरी त्याचा मूळ पिंड कथाकाराचा. कलात्मक व आशयगर्भ कथा लिहिणं ही मंटोची खासियत. नैतिकता आणि अश्लीलतेच्या पारंपरिक धारणांशी त्याचं उपजत वैरच होतं म्हणायचं.

वाचावे असे काही/१३०