पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/12

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कारण त्यांचा वापर नसणे हेच होय. पैलवानाचे दंड, तिरंदाजाचे डोळे, गवयाचे कान, वादकाची बोटे कुशल का तर कौशल्यपूर्ण वापर नि फिरवणूक हेच त्याचं कारण. वाचन ज्ञान-विज्ञानाचा, विद्याशाखांचा फेर धरत माहिती व संदर्भाचा परीघ रुंदावत राहते.

 वाचन' शब्दाची व्युत्पत्ती वच्' धातूपासून झालेली आहे. त्या अनुषंगाने वाचनाचा अर्थ होतो बोलावणे. आपण कागदावर लिहिलेले वाचतो म्हणजे लिखिताला बोलते करतो. आपलं लेखन, वाचन म्हणजे मातृकांचा मिलाफ. मराठीत पंधरा स्वर (ॐ, अनुस्वार, विसर्ग सहित) नि ३५ व्यंजने असा ५० मातृकांचा संच होय. या मातृकांना बोलते करण्याची, क्रियाशील बनवण्याची क्रिया, कला म्हणजे वाचन. बुद्धिमान माणूस कालपव्यय करत नाही. तो काळ सत्कारणी लावतो. काव्य, शास्त्र, विनोद इ. वाचनाने तो काळाचा सदुपयोग करत असतो. उलटपक्षी व्यसनाधीन, निद्राधीन (मूर्ख) आपला वेळ रिकामा दवडतात किंवा वादावादीत घालवितात असा अर्थाचा एक संस्कृत श्लोक आहे तो वाचनाचे महत्व अधोरेखित करतो-

 काव्य शास्त्रविनोदेन कालो गच्छति धीमताम।
 व्यसनेन तु मूर्खाणां निद्रया कलहेन वा।।

 आपल्या समाजात वाचणारे हाताच्या बोटावर मोजता येईल असे तर अगणित न वाचणारे. वाचता न येणे मी समजू शकतो. ते एकवेळ मी क्षम्यही मानतो. पण वाचता येत असताना न वाचणे माझ्या लेखी शुद्ध अपराध नि आळस होय. वाचासिद्धी असा शब्द मौखिकाशी संबंधित. तशी वाचनसिद्धीही असते. मौखिक काळातील सृजन हे 'वाङ्मय' म्हणून ओळखले जायचे ते वाक्मय' होते म्हणून. संथापठन, पाठांतर हे वाचनाचे प्राथमिक रूप होय. मातृकांची स्वर, स्वरादी, व्यंजनांची ओळख घडविणाऱ्या प्रारंभीच्या काळात प्रगट वाचन मात्र उच्चारण (Utterance) होतं. माणूस जसजसा वाचू, विचार करू लागला तसं उच्चारणाचं आकलन (Com- prehension) होणं महत्वाचं होत गेलं. मग पुढे समजणं (Under- standing) ही वाचनाची कसोटी बनून गेली.

 यातून वाचन विवेक जन्माला आला. वाचन विवेक म्हणजे माणूस का वाचतो याचा विचार रंजनासाठी वाचणं गरजच. पण ज्ञानासक्त वाचन उपयुक्त हा विचार वाचन विवेकातून जन्माला आला. मग वाचन विधिनिषेध माणसास कळला. रस, भाव, विकार, विचार, ज्ञान, विज्ञा, सर्व वाचनातून साकारते.शृंगार सुखावह पण करुणा हितावह असा विचार वाचन विवेकाने

वाचावे असे काही/११