पान:वाचन (Vachan).pdf/48

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

परिणामी लेखनासाठी पपायरसऐवजी चर्मपत्रांचा वापर वाढला. चर्मपत्रे ही शेळी, मेंढी, वासरांच्या चामड्यांपासून बनविली जात. कातडी कमावून (Tanning) (निवळी, चुनकळीत भिजवून) ती बनवली जात असल्याने लेखनासाठी ती मऊशार कातडी उपयुक्त ठरत असे. ती ताणवून वाळवली जात असल्याने कागदासारखा सरळ पृष्ठभाग असलेली चर्मपत्रे लेखनासाठी सुलभ बनत.
 लॅटिन भाषेतील आद्यलिखिते चर्मपत्रांवर आढळून आली आहेत. पूर्वीच्या धर्मपीठ आणि मठांमध्ये अशा हस्तलिखितांच्या प्रती करणे, कित्ता गिरविणे असे ग्रंथ इतरांना उपलब्ध करून देण्यासारख्या परंपरा इतिहासात आढळतात. विशेषतः पश्चिम रोममध्ये ही परंपरा प्रचलित होती. कॅसिओडोरसने या परंपरेस प्रोत्साहन दिले होते. सहाव्या शतकात सेंट बेनेडिक्टने ग्रंथ वाचनाची परंपरा रुजावी म्हणून प्रयत्न केले होते. तत्कालीन धर्मपीठांच्या आश्रयामुळे लेखन, वाचनकलेस गती आल्याचे दिसून येते. मुद्रणपूर्व युगात कित्ता हेच मुद्रण होते. सर्व धर्मपीठे, मठ हे तत्कालीन ज्ञानभांडाराचे आगर (Information Repository) म्हणून ओळखले जायचे ते हस्तलिखितांच्या संग्रहणामुळेच. ख्रिश्चन धर्मपीठातील पुनरावलोकन सभागार (Chapter house) वर अशी संग्रहालये सर्वत्र आढळतात. ती हस्तलिखित संग्रहालये (SCriotoriums) म्हणून ओळखली जायची. तिथे सूर्यप्रकाश नसे. हस्तलिखिते खराब होऊ नयेत म्हणून अशा संग्रहालयांची रचना अंधारगृह (Dark Room) सदृश असे. अशा संग्रहालयांमधून वळणदार अक्षर लेखक (Calligraphers) , कित्ताकार (piers) , लेखन परीक्षक (correctors) , Falak (Illuminators) , 3791 Ch (Rubricators) (लाल अक्षरात सूचना लिहिणारे) अशी पदे असते. अशा नियुक्त व्यक्तींमार्फत कित्ते डोळ्यांत तेल घालून करवून घेतले जात. कित्त्यांची सत्यता आणि शुद्धता (बरहुकूम) अत्यंत काळजीपूर्वक जपली जात असे. (प्राचीन लेखक छायाचित्र पहा.)

 युरोपप्रमाणे मध्यपूर्वेतील सिरिया, अरबस्तान, इराण, इराक इत्यादी देशांमध्ये ज्यू, ख्रिश्चन, झेइस्ट, मुस्लिम इत्यादी धर्मामध्येही हस्तलिखित ग्रंथांची परंपरा दिसून येते. पर्शियन, अरेबिक, हिब्रू इत्यादी भाषांतील पूर्वापार धर्मग्रंथ इत्यादी वाङ्मय कित्ता करण्याचा प्रघात होता.

वाचन/४७