पान:वाचन (Vachan).pdf/47

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कल्पना संग्रह ग्रंथांतून उदयाला आली. झाडांच्या सालीवरील असे लेखन वेलींच्या देठांमध्ये गुंफून ठेवण्याची जी परंपरा प्राचीन काळात होती, त्यातून संग्रह ग्रंथ तयार केले जाऊ लागले. खरे तर यातूनच 'ग्रंथ' (Book) संकल्पना अस्तित्वात आली.
  एकाच आकाराची पाने एकत्र शिवून वाचण्यास सुलभ करण्याच्या गरजेतून पुस्तकांचा जन्म झाला. ते सुरक्षित ठेवण्यासाठी आवरण, वेष्टन (Cover) उदयाला आले. पाने, पत्रे सुटू नयेत म्हणून चिकटवून शिवले जाऊ लागले (Binding). सर्वांत जुना संग्रह ग्रंथ म्हणून मार्शलच्या 'Apophoreta Cxxxiv' चा उल्लेख केला जातो. हा ग्रंथ पहिला सुभाषित कोश (Dictionary Of Quotations) म्हणूनही महत्त्वाचा मानला जातो. (संग्रह ग्रंथ कपाटाचे छायाचित्र पहा.)
हस्तलिखिते(Manuscripts)
 इसवी सनाच्या पाचव्या शतकात रोमन साम्राज्याचा पराभव झाला. त्यामुळे रोमन संस्कृतीची एका अर्थाने अधोगतीच सुरू झाली. इजिप्तशी राजकीय व व्यापारी संबंध संपुष्टात आल्याने पपायरसची आयात थंडावली.

संग्रह ग्रंथ (कोडेक्स) ठेवण्याचे कपाट

वाचन/४६