पान:वाचन (Vachan).pdf/49

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्राचीन लेखक

इसवी सनाच्या आठव्या ते तेराशे शतकाचा काळ हा मुस्लिम धर्माच्या दृष्टीने सुवर्णकाळ होता. त्या काळात कुराणादि साहित्य कलात्मक हस्ताक्षरकांकडून कित्ता करून घेतले जायचे. अशा ग्रंथांची मोठी बाजारपेठ या काळात वरील देशांमध्ये तेजीत होती. एकट्या बगदादमध्ये हिजरी ९०० काळात १०० कित्ता विक्रेते / पुस्तक विक्रेते होते, असे याकुबीने लिहून ठेवले आहे. यावरून तत्कालीन हस्तलिखिताचा प्रचार, प्रसार किती व्यापक होता, ते लक्षात येते. त्या काळात कित्ता वाचन प्रगट व्हायचे. लेखक ऐकून ते प्रमाणित करायचा. मग कित्ता करण्यास परवानगी दिली जायची; पण अधिकांश पुस्तकांच्या मूळ प्रतीच असत, कित्ता अपवाद. कित्ता सर्रास फक्त धर्मग्रंथांचा होत असे.
लाकडी ठसे (Wooden Blocks)

  गुंडाळी, विटा, चर्मपत्रे, भूर्जपत्रे इ.नंतर मुद्रणयंत्र पूर्व युगात छपाईसाठी लाकडी ठसे वापरले जायचे. चीनमधील हान राजवटीच्या काळात इ.स. २२० च्या सुमारास लाकडी ठसे वापरले जायचे. हे ठसे म्हणजे लाकडी उठाव असत. उठाव उलटे असत. शाई, रंगांचा वापर करून चित्रे, अक्षरे कागदावर उठविली जात असत. त्यांच्या बांधणीने हस्तलिखित ग्रंथ तयार होत असत. पूर्व आशियाई देशात अशी हस्तलिखिते तयार होत. Diamond Sutra (इ.स. ८६८) हे लाकडी ठशाच्या छपाईतून साकारलेले प्रसिद्ध पुस्तक होय.

वाचन/४८