पान:वाचन (Vachan).pdf/46

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गुंडाळीच्या रूपात असलेले पुस्तक असे वाचले जात असे.

गुंडाळी पुस्तके ग्रंथालयातील फडताळावर अशी ठेवली जात असत.

संग्रह ग्रंथ (Codex)

 अनेक ग्रंथ बांधून, शिवून एकत्र जपण्याची परंपरा इतिहासात आढळते. पपायरसच्या गुंडाळीवर एक पुस्तक असे. अशा अनेक गुंडाळ्या वाचन सुलभता व सुरक्षिततेच्या दृष्टीने एकत्र करण्याची परंपरा नंतरच्या काळात सुरू झाली. पपायरस, चर्मपत्रे, भूर्जपत्रे, वेताच्या पट्या इत्यादींवर केलेले लेखन एकत्र करण्यातून संग्रह ग्रंथ (Codex) निर्माण झाले. ते दरबार, ग्रंथालय इत्यादी ठिकाणी असत. यातूनच पुराभिलेखागार (Archives) चा जन्म झाला. पुरातन वारसा, ज्ञान, अनुभव (Heritage) इ.चे रक्षण करण्याची

वाचन/४५