पान:वाचन (Vachan).pdf/31

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

३.२.३ अमेरिका लिपी
अमेरिका खंडात वापरात असलेल्या लिप्यांमध्ये माया लिपी सर्वाधिक प्राचीन होय. तिचा वापर प्राचीन स्तंभ, शिलालेखात आढळतो. या लिपीची परंपरा ऑम्लेक्स लेखन पद्धतीशी मिळतीजुळती आहे. तिचा वापर कॅलेंडर तयार करण्यासाठी केला जात असे. जोपेटेक्सच्या शिलालेखात या लिपीच्या पूर्व खुणा दिसून येतात. माया लिपी ध्वनी आधारित लिपी होय. प्रारंभी चित्ररूपात तिची अभिव्यक्ती दिसून येते. खगोलशास्त्र, वंशावळी, प्राचीन अभिलेखात या लिपीचा वापर झालेला दिसून येतो. तत्कालीन प्रार्थना मंदिर (चर्च) प्रशासनातही या लिपीचा वापर होत असे. हा काळ सनाच्या दुस-या, तिस-या शतकाचा होय.
उलफिलसची वर्णमाला
 इ.स. ३६० मध्ये उलफिलस या बुद्धिमान गृहस्थाने बोली भाषांना लिपी देण्याचे ऐतिहासिक कार्य केले. त्याने एकूण ८६ वर्णाक्षरे तयार केली. गॉथिक पारंपरिक बोलींना भाषारूप देण्याचे कार्य त्याने केले. ग्रीक, रोमन २७ वर्ण घेऊन त्या आधारे त्याने नवी वर्णमाला तयार केली. ग्रीक बायबलचे लिप्यंतरण त्याने गॉथिक भाषेत केले. जेरोमने लॅटिन बायबलचे रूपांतर केले. त्या अगोदर कितीतरी वर्षे उलफिलसने हे कार्य केले. आपण हे ईश्वरीय पवित्र कार्य करतो आहोत, अशी त्याची धारणा होती. पुढे त्याच्या या उपक्रमाचे अनुकरण सिरिल व मोथेडिअस या मिशनरींनी केले (इ.स. नववे शतक). १९व्या शतकात चेरोकी इंडियन्सनी या लिपीचा स्वीकार केला.
३.३ भारतीय भाषा आणि लिपी भारतीय राज्यघटनेनुसार हिंदी आपल्या देशाची राजभाषा आहे. भारतीय राज्यघटनेने आठव्या परिशिष्टात भारतीय राजभाषा निर्देशित केल्या आहेत. भारतीय प्रजासत्ताकातील संघराज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना आपापल्या प्रदेशातील भाषा व लिपी निवडून त्यांमध्ये राज्यकारभार करण्याची मुभा

आहे. त्या त्या प्रदेश वा केंद्रशासित प्रदेशांतील विधानसभा भाषा व लिपींचा निर्णय करतात. भारतीय संघराज्यात ३० राज्ये आणि ६ केंद्रशासित प्रदेश आहेत. (१) आसाम, (२) ओडिसा, (३) आंध्र प्रदेश, (४) अरुणाचल प्रदेश, (५) बिहार, (६) छत्तीसगड, (७) दिल्ली, (८) गोवा, (९) गुजरात, (१०) हरियाणा, (११) हिमाचल प्रदेश, (१२) जम्मू आणि काश्मीर, (१३) झारखंड, (१४) कर्नाटक, (१५) केरळ, (१६) मध्य प्रदेश

वाचन/३०