पान:वाचन (Vachan).pdf/30

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लिपी उत्क्रांती ही ज्या त्या भाषेच्या पर्यावरणीय, सांस्कृतिक स्थितीनुसार कमी, अधिक काळाची राहिली आहे. सुपीक, मैदानी प्रदेशात भाषा, लिपी विकासाची गती अधिक तर डोंगराळ, अडचणीच्या प्रदेशात कमी. लिपीबद्दल अंतरिक व बाह्य दोन्ही प्रकारचे असतात. ते समुदायात घडतात तसे बाह्य संपर्कानेपण.
३.२.१ ध्वनीसूचक वर्ण लिपी
 ध्वनी प्रतिबिंबित करणारे वर्ण/अक्षरे निर्माण झाली इ.पू. पंधराव्या शतकात. या आविष्कार नि प्रयोगात भाषा विकासाच्या असंख्य संभावना होत्या, हे त्यावेळी जरी लक्षात आले नसले तरी नंतरच्या विकास काळात प्रत्ययास आले. यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली, ती अशी की पूर्वीच्या चिन्हांची गूढ गम्यता व अनाकलनीयता समाप्त झाली. चिन्ह नि चित्रांचे अर्थ लावण्यात जी तर्कशक्ती खर्च व्हायची ती संपुष्टात आली. लिपी, अक्षरे, वर्ण ध्वनिसूचक झाले. त्यात उच्चार समानता निर्माण होऊन पुढे अर्थविकास घडून आला. अनेक वर्ण जन्माला येऊन नंतरच्या काळात स्वर, व्यंजनात त्यांचे वर्गीकरण झाले. इ.स. पूर्व २००० मध्ये यांचा वापर, विशेषत: अंकांचा, आकडेमोडीचा, गणिताचा वापर सुरू झाला. सेमेटिक भाषा समूह / कुटुंबातील भाषांमध्ये हा वापर रूढ झाला. आर्मेनियन, हिब्रू भाषा उदाहरण म्हणून सांगता येतील. आजची अरेबिक या व्यवस्थेतून जन्मलेली, विकसित झालेली भाषा होय. ग्रीक भाषेने इ.स. पूर्व आठव्या शतकात या व्यवस्थेचा स्वीकार केला. २४ वर्णमाला असलेली लिपी यातून उदयाला आली. अल्फाबेट (Alphabets) शब्द यातून निर्माण झाला. त्याचे मूळ ध्वनिमूलक भाषा व्यवस्थेत (Phonecian System) आढळते. रोमन साम्राज्यात लॅटिन भाषेसाठी अशी वर्णमाला अंगीकारण्यात आली. ती नंतर युरोपात व उत्तरार्धात सर्व जगभर प्रचलित झाली. पपायरस, ठसे, ठोकळे, भूर्जपत्रे इत्यादी वापराने लेखन नित्याची गोष्ट होऊन गेली.

३.२.२ अरबी लिपी इ.स. पूर्व पाचव्या शतकात कोरीव स्तंभांवर ही लिपी वापरात आली. अरेबियात तिची प्रारंभिक रूपे आहेत. मूळ सेमेटिक भाषा समूहात या लिपीचा वापर झाला. कुराणाचे लेखन अरबी (Persian) लिपीत झाले. कुराणाद्वारे या लिपीचा जगभर प्रचार, प्रसार झाला. इस्लाम धर्माची ती लिपी बनली. आज अरब देशांशिवाय अनेक आशियाई देशात या लिपीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. प्राचीन साहित्यही या लिपीत मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.

वाचन/२९