पान:वाचन (Vachan).pdf/१६४

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


अभिप्राय - ३ वाचलेखन-वाचनप्रक्रियेचा विचार करणारे पुस्तक

  वाचन ही व्यक्तीला प्रगल्भ बनवून त्याच्या जाणिवांचा विकास करणारी कृती आहे. लेखन वाचनाचा मूलगामी विचार अनेक विचारवंत आणि कवी-लेखकांनीही केलेला दिसतो. यापैकी मराठीतील दोन नावे सहज आठवतात, ती भालचंद्र नेमाडे आणि विलास सारंग यांची. या दोघांनीही भाषा, भाषांतर, वाचन, लेखन याविषयी चिंतनशील मांडणी केलेली आहे. पैकी विलास सारंग यांनी आपल्या कविता १९६९-१९८४' या संग्रहातील ‘जगणं-बिगणं' कवितेची पाठराखण करताना प्रास्ताविकात ही कविता जगण्याविषयी आहे, तितकीच 'बिगण्याविषयी आहे, असे लिहिले आहे. सारंगांनी येथे 'बिगणं सारख्या अर्थहीन शब्दाला अर्थवाही केले आहे. सारंग बिगण्याविषयी म्हणजे, मराठी भाषेचे एक वैशिष्ट्य साजरं करण्याचा, त्याचा शोध घेण्याचा एक प्रयत्न समजतात. नेमकं हेच डॉ.सुनीलकुमार लवटे यांच्या नुकतंच प्रसिद्ध झालेल्या 'वाचन' या पुस्तकाविषयी सांगता येईल. हे पुस्तक वाचना-

बिचना'विषयी आहे. म्हणजे हे पुस्तक जेवढे वाचनाविषयी तेवढेच बिचनाविषयी आहे. येथे बिचनाविषयी म्हणजे वाचनाशी निगडित येणाऱ्या सर्व गोष्टींविषयी असा अर्थ अभिप्रेत आहे. भाषेच्या उत्पत्तीपासून- म्हणजे माणूस कधीपासून भाषा वापरू लागला? त्याने लेखनप्रक्रियेचा शोध कधी लावला? लोकसाहित्य हे त्याच्या अभिव्यक्तीचे पहिले माध्यम कसे होते? प्रारंभी मानवाचे लेखनासाठीचे माध्यम काय राहिले? ग्रंथ आणि ग्रंथालयांची निर्मिती कशी आणि कधी झाली?- म्हणजेच माणसाच्या व्यक्त होण्याच्या प्रारंभापासून लोकसाहित्याची निर्मिती,

वाचन/१६३