पान:वाचन (Vachan).pdf/१२४

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


३. लेखकांना आपले सर्जनशील कार्य करता यावे याकरिता अनुकूल अशी परिस्थिती निर्माण करणे, ही एक समाजाची खास जबाबदारी आहे.  मानवी हक्कांच्या जागतिक अधिकथनामध्ये असे म्हटले आहे की, प्रत्येक लेखकास असा हक्क असला पाहिजे की, त्याच्या शास्त्रीय, वाङ्मयीन किंवा कलात्मक निर्मितीपासून मिळणारे नैतिक आणि भौतिक फायदे सुरक्षित राखले जातील. असे संरक्षण अनुवादकांनाही दिले गेले पाहिजे. कारण, त्यांच्या कार्यामुळे ग्रंथ भाषेची सीमा ओलांडू शकतात आणि लेखक व अधिक विस्तृत असा वाचकवर्ग यांमध्ये आवश्यक असा दुवा निर्माण होतो.  सर्व देशांना आपले सांस्कृतिक वैशिष्ट्य व्यक्त करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे संस्कृतीकरिता आवश्यक असणारी विविधता अबाधित राहते. याकरिता त्यांनी लेखकांना आपले सर्जनशील कार्य करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे व तसेच इतर भाषांमध्ये, यात मर्यादित प्रसाराच्या भाषाही अंतर्भूत आहेत. उपलब्ध असलेल्या वाङ्मयातील अक्षरकलाकृती अनुवादित स्वरूपात अधिक मोठ्या वाचकवर्गास उपलब्ध होतील, अशी व्यवस्था केली पाहिजे. ४. राष्ट्रीय विकासाकरिता सुसंघटित प्रकाशन व्यवसायाची आवश्यकता आहे.  आज जगामध्ये ग्रंथनिर्मितीच्या बाबतीत फारच मोठी तफावत असल्यामुळे अनेक देशांत वाचन साहित्याचा पुरेसा पुरवठा होत नाही. याकरिता राष्ट्रीय प्रकाशन व्यवसायाच्या विकासाच्या योजना तयार करणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक राष्ट्राने पुढाकार घेतला पाहिजे व आवश्यक त्या आधारभूत यंत्रणेच्या निर्मितीस साहाय्य करण्याकरिता जरूर तेथे आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळविले पाहिजे.

 प्रकाशन व्यवसायाच्या विकासाकरिता शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक नियोजनाशी समन्वय साधणे आवश्यक आहे. शक्यतो ग्रंथांशी संबंधित असलेला सर्व समाज, राष्ट्रीय ग्रंथ विकास समिती व तत्सम संस्था यांच्यातर्फ सहभागी होईल अशा त-हेने व्यावसायिक संघटनांनी या विकासकार्यात भाग घेतला पाहिजे तसेच राष्ट्रीय किंवा दोन वा अधिक राष्ट्रांच्या सहकार्याने दीर्घमुदतीची कर्जे कमी व्याजदराने मिळाली पाहिजेत.

वाचन/१२३