पान:वाचन (Vachan).pdf/१२३

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ डॉक्युमेंटेशन, दि इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ लायब्ररी असोसिएशन्स, दि इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ट्रान्स्लेटर्स, इंटरनॅशनल पेन व इंटरनॅशनल पब्लिशर्स असोसिएशन;  या संस्था एकमुखाने प्रस्तुत ग्रंथ सनदेचा स्वीकार करीत आहेत आणि त्यामध्ये विशद केलेल्या तत्त्वांचा अवलंब करावा, असे सर्व संबंधितांना आवाहन करीत आहेत. तत्त्वे १. प्रत्येकाला वाचनाचा अधिकार आहे. वाचनाचा फायदा उपभोगण्याची संधी प्रत्येकाला मिळेल अशी दक्षता घेणे हे एक समाजाचे कर्तव्य आहे. जागतिक लोकसंख्येचे फार मोठे विभाग वाचता येत नसल्यामुळे ग्रंथांपासून दुरावले जातात. त्यामुळे निरक्षरतेच्या अरिष्टाचे निर्मूलन करण्याकरिता साहाय्य करण्याची जबाबदारी शासनांवर येऊन पडते. वाचनाचे कौशल्य निर्माण करून ते टिकविण्याकरिता लागणा-या मुद्रित साहित्याचा पुरवठा व्हावा याकरिता शासनांनी उत्तेजन दिले पाहिजे. ग्रंथ व्यवसायांना आवश्यक तेव्हा उभयपक्षीय व बहुपक्षीय साहाय्य उपलब्ध केले पाहिजे. त्याचबरोबर ग्रंथ निर्माते व वितरक यांची ही जबाबदारी आहे की, ते अशा रीतीने प्रसृत करीत असलेल्या कल्पना व माहिती वाचकांच्या आणि अखिल समाजाच्या बदलत्या गरजांना अनुरूप अशीच असतील. २. शिक्षणाकरिता ग्रंथ आवश्यक आहेत.

आजचे युग हे शैक्षणिक क्षेत्रातील क्रांतिकारक बदलांचे व शाळांमध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर नोंदविण्याच्या दूरगामी कार्यक्रमांचे आहे. तेव्हा शैक्षणिक पद्धतींच्या विकासाकरिता पाठ्यपुस्तक या घटकाचा पुरेसा पुरवठा व्हावा म्हणून नियोजनाची आवश्यकता आहे. शैक्षणिक पुस्तकांची गुणवत्ता व मजकूर यांमध्ये सतत सुधारणा करण्याची आवश्यकता जगातील सर्व देशांत भासते. पाठ्यपुस्तके व त्याचबरोबर विशेषत: शालेय ग्रंथालयांना व साक्षरता कार्यक्रमाकरिता लागणारे सर्वसाधारण शैक्षणिक वाचनसाहित्य यांचा पुरवठा करण्याकरिता विभागीय उत्पादनाची राष्ट्रीय प्रकाशकांना मदत होऊ शकते.

वाचन/१२२