पान:वाचन.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९०
वाचन.

संस्था-वेकनचे निबंध-स्वातंत्र्य - स्त्रियांची परवशता - कार्लाईल- वगैरे पुस्तकांत इंग्रजी ग्रंथकारांचे उत्तमोत्तम विचार असल्यामुळे ती वाचणें अवश्य होत.
 अध्यात्म व तत्वज्ञान. या विषयांवर मराठीत अनेक ग्रंथ आहेत. वेदान्त विषयावर अनेक ग्रंथ असून गीता, उपनिषदें वगैरे ग्रंथांचीं मराठीत अनेक भाषांतरे झाली आहेत. हर्बर्ट स्पेन्सर, प्रो. म्यॉक्स मुलर, मिसेस आनी बेझांट यांच्या ग्रंथांची मराठीत रूपान्तरे झाली आहेत. सुप्रसिद्ध स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेत वेदान्त विषयावर जी. सुरस व्याख्यानें दिलीं, त्यांची मराठींत राजयोग, कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग अशीं भाषांतरे झाली आहेत. कित्येक उपनिषदांची भाषांतरे झाली आहेत, ती अवश्य वाचनीय आहेत. अनंताशी साधर्म्य - ज्ञेय मीमांसा-अज्ञेयमीमांसा गृहस्थाश्रम - सुलभ वेदान्तगुच्छ-अद्वैत-- मीमांसा - दासबोध - पंचदशी-आत्मविद्या- कै. रानडे, मोडक व डा. भांडारकर यांची धर्मपर व्याख्यानें, हीं या विषयांवरील ठळक ठळक पुस्तकें होत.
 भाषा व व्याकरण. — भाषेच्या अभ्यासांत भाषेचा इति- हास, व्याकरण, भाषाशास्त्र याची चांगली ओळख असावी लागते. वाङ्मयाच्या विद्यार्थ्यांनी भाषेचे इतिहास अवश्य वाचावेत. मराठी भाषेचा इतिहास अद्यापि कोणीं लिहिला नाहीं, ही मोठ्या दुःखाची गोष्ट होय ! दादोबा पांडुरंग, गोडबोले, कृष्णशास्त्री चिपळूणकर, रेव्ह. नवलकर, रा. भि. जोशी, यांनी मराठी व्याकरणावर मोठे ग्रंथ लिहिले आहेत. मराठी भाषेच्या लेखनपद्धतीवर साने, हतवळणे, गुंजीकर यांची पुस्तकें आहेत. लेलेकृत साहित्यशास्त्र, अलंकार प्रकाश, गोरेकृत अलंकारचंद्रिका - आगरकरकृत वाक्यमीमांसा हीं पुस्तकें मनन करण्यासारखी नाहींत असें कोण म्हणेल ? रा. पावगी.. कृत भाषाशास्त्र, प्राकृत भाषेचा इतिहास, हीं पुस्तकें विद्या-