पान:वाचन.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठी पुस्तकें.

८९

नये. यांची भाषा जोरदार असून तींत शब्दलालित्य व अर्थगांभीर्य विशेष आहे. हे कट्टे सुधारक होते व यांनी आपल्या लेखणीनें महाराष्ट्रांत विशेष चळवळ उडवून दिली होती. धनुर्धारी यांची शब्दयोजना मनन करण्यासारखी असून, यांची भाषा आवेश- युक्त व अभिमानोत्तेजक अशी आहे. थोडक्यांत स्पष्ट व खोंच- दार लिहिण्याची हातोटी रा. टिळक यांना साधली आहे. रा० राजाराम रामकृष्ण भागवत यांची भाषा जोमदार परंतु तुटक आहे. मराठ्यांसंबंधानें चार उद्गार व महाराष्ट्र धर्म हीं यांची पुस्तकें वाचण्यालायक आहेत. रा. आठल्ये केरळकोकिळ मासिक पुस्तक- कर्ते व कै. ना. वि. बापट यांची भाषा सरळ, हृदयंगम व वर्णन शैली. सुरस आहे. रा. गोळे यांची भाषा प्रौढ व मनोवेधक आहे. कुटुंबाचा अभिमान, ब्राह्मण आणि त्यांची विद्या, हिंदुधर्म आणि सुधारणा हीं यांची पुस्तकें अवश्य वाचण्यासारखी आहेत. रा. वि. ओक यांनीही अनेक निबंध लिहिले आहेत. विषय मांडणी थोडक्यांत व सुगम करण्याची यांना हातोटी साधली आहे.
 मराठीतील निवडक निबंध म्हटले म्हणजे प. रमाबाई कृत स्त्रीधर्मनीति - वैद्यकृत अबलोन्नतिलेखमाला, - ओककृत प्रपंच रहस्य, केसरीतील निवडक निबंध- कृष्णशास्त्री चिपळूणकरकृत अनेक विद्यामूलतत्वें - विष्णुशास्त्री चिपळूणकरकृत निबंधमाला -* हंसकृत मोरोपंत व वामनपंडित-भिडेकृत मुक्तेश्वर व वामनपंडित- बोडसकृत अद्वैतमीमांसा ही पुस्तकें अवश्य वाचण्यासारखीं आहेत.

 इंग्रजी भाषेत जीं सुप्रसिद्ध पुस्तके आहेत त्यांपैकी कित्ये कांचीं रूपान्तरें मराठींत झाली आहेत. कर्तव्यसुख अथवा संसारसुख, जीवित कर्तव्य - सद्वर्तन - स्वतःचा प्रयत्न- पाश्चात्य राष्ट्राची सामाजिक उत्क्रांति, प्राच्य व पाश्चात्य देशांतील ग्राम-


 पान ८८ वरील टीप पहावी.