पान:वाचन.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
उपसंहार.

९१

र्थ्यांनी अवश्य पहावी. ओककृत महाराष्ट्र वाङ्मय, आप मराठी वाङ्मयाचा अभ्यास, 'पांगारकर यांचे 'मराठी भाषेचे स्वरूप ' व भावे यांचे 'महाराष्ट्र सारस्वत हीं पुस्तकें ज्ञानार्थी वाचकांनी अवश्य पहावीं. गद्यरत्नः समुच्चय व वाचन पाठ- माला ह्या पुस्तकांत अनेक मराठी ग्रंथकारांच्या ग्रंथांतील उतारे. दिले असल्यामुळें तीं विद्यार्थ्यांना उपयुक्त नाहींत, असें कोण म्हणेल १


भाग १० वा.
उपसंहार.

वाचन ह्या विषयाचे येथवर यथामति विवेचन झालें. आपणास सत्यज्ञान व्हावें, पुष्कळ ज्ञान व्हार्वे, आपले विचार उदार व्हावे, कार्य कारणाचा संबंध कळावा व त्या ज्ञानाचा आपल्या.. वर्तनावर उचित सुपरिणाम व्हावा, हे हेतु मनांत धरून लीन- भावाने आपणास विद्यार्थी समजून मनुष्यानें ज्ञानार्जनाचें व्रत आमरण चालविलें पाहिजे.. आयुष्यांत गृहशिक्षण, शाळेतलि शिक्षण व प्रौढ वयांतील शिक्षण अशा शिक्षणाच्या तीन प्रमुखा- वस्था असतात. वाचनाची संवय लहानपणापासून लागली ह्मणजे पुढें ती आपोआप वृद्धिंगत होते, हें पूर्वी सांगितलेंच आहे. तिजबरोबर अवलोकनशक्ति, धारणाशक्ति व विवेकशक्ति यांचीही अभिवृद्धि झाली पाहिजे, असे झाले ह्मणजे विद्येची ग उत्पन्न होऊन त्या विद्येचा मनात उत्तम परिपाक बनतो. मोद- मोठ्या विषयांचे आकलन करण्यास व त्यांतील रहस्य शोधण्यास' युद्धीच्याठायीं पात्रता येते. वाचनाचा अंतिम हेतु नेहमी