पान:वाचन.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८८
वाचन.

निबंध. वेद, उपनिषदें, वेदान्त वगैरे विषयांवर संस्कृतांत भाष्ये आहेत. भाष्य हा एक प्रकारचा निबंधच होय. कोण- त्याही विषयाचे विवेचन करणें, समर्थन करणें, प्रस्तुत मत- खंडन करून नवीन मत स्थापन करणें, या हेतूनें निबंध लिहिलेले असतात. कै. स. का. छत्रे, बाळशास्त्री जांभेकर, गो. ना. माडगांवकर, कृष्णशास्त्री चिपळूणकर हे मराठीतील प्राचीन गद्यग्रंथकार होत. रा. छत्रे यांचे इसापनीति व बाळ- मित्र असे दोन भाषांतररूप ग्रंथ आहेत. बाळशास्त्री जांभेकर व कृष्णशास्त्री चिपळूणकर यांची भाषा शुद्ध व सरळ असल्या- मुळें मराठी भाषेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे निबंध अवश्य पहावे, अशी त्यांना सूचना आहे. मराठी भाषेत प्रख्यात निबंधकार ह्मणजे कै. विष्णुशास्त्री चिपळूणकर हे होत. इंग्रजींत ज्याप्रमाणें प्रथम ऑडिसननें निबंध लिहून अनेक विषय वाचण्याची लोकांना गोडी लाविली, त्याप्रमाणें शास्त्री - बुवांनी मराठी भाषा, मराठ्यांचा इतिहास, जुने मराठी कवि व त्यांची काव्यें इत्यादि अनेक विषयांवर निबंध लिहून मराठी वाचनाची प्रथम अभिरुचि उत्पन्न केली. यांची भाषा सरळ, जोरदार मनांत ठसणारी व अभिमानोत्तेजक अशी आहे. निबंध- माला* नामक मासिक पुस्तकाचेद्वारा जोरदार भाषेत त्यांनी अनेक विषयांची चर्चा केली आहे. आपल्या अद्वितीय लेखनशक्तीनें योनी महाराष्ट्रास हालवून सोडलें होतें, असें हाटलें असतां अति- शयोक्ति होणार नाहीं. मराठी भाषेच्या विद्यार्थ्यांनीं यांचे ग्रंथ अवश्य वाचावेत. लोकहितवादीने अनेक निबंध लिहिले आहेत. यांची भाषा सरळ व प्रौढ आहे. शास्त्रीबुवा हे जुन्या मताचे व लोकहितवादी हे सुधारणाप्रिय होते. कै. आगरकर यांचा निबंधसंग्रह ' विविध विषयसंग्रह ' मराठीच्या विद्यार्थ्यांनीं वाचल्याशिवाय राहूं


 * या मार्लेतील 'आमच्या देशाची स्थिति' हा भाग अक्षेपार्ह ठरून सरकारजमा झाला आहे.