पान:वाचन.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठी पुस्तकें.

८७

हाटल्यास गैरवाजवी होणार नाहीं. अशा प्रकारची चरित्रे नेव्हां होतील तेव्हांच तीं विशेष वाचनीय होतील. या आधुनिक मंडळींच्या चरित्रांपासून नवीन पिढीस बराच बोध घेण्या- जोगा असल्यामुळे त्यांची चरित्रे वाचणें बोधप्रद होईल, यांत संशय नाहीं.
 प्रवासवर्णने व स्थलवर्णने. - प्रवासाची आवड आमच्या लोकांत फारशी नाहीं. धार्मिक अडचणीमुळे व आप्तवर्ग सोडून परदेशांत जाण्यास कोणीही सहसा धजत नाहीं. अशा अनेक अडचणी असल्यामुळे प्रवासवर्णनात्मक व स्थलवर्णनात्मक ग्रंथ मराठीत व्हावे तेवढे झाले नाहींत, ही मोठ्या दुःखाची गोष्ट होय ! कै० करसनदास मूळजी यांच्या विलायतच्या प्रवासाचे मराठी भाषांतर झाले आहे. रा. रावजी भवानराव पावगी यांनी आपला विलायतचा प्रवास लिहून प्रसिद्ध केला आहे. पंडिता रमाबाई यांचा विलायतचा प्रवास, युनायटेड स्टेट्सची लोकस्थिति व प्रवासवृत्त हीं पुस्तकें वाचनीय आहेत. कै सरदार अण्णासाहेब विंचूरकर यांनी उत्तर व दक्षिण हिंदुस्थानां- तील ज्या अनेक तीर्थयात्रा केल्या, त्यांची माहिती 'तीर्थयात्रा - प्रबंध' नामक पुस्तकांत दिली आहे. काश्मीर प्रांत ह्मणजें केवळ नंदनवन; परंतु त्या प्रांताच्या वर्णनात्मक असे मराठीत एकच पुस्तक आहे. उदासकृत धौममहाबळेश्वरवर्णन सुर भाषेत लिहिलेले असल्यामुळे अवश्य वाचनीय झाले आहे, विजापूर, काशी, दिल्ली या इतिहासप्रसिद्ध शहरांची वर्णने झालीं आहेत. रा. गोगटे यांचे महाराष्ट्रातील किल्ले, के, शंकर बा. दीक्षित यांचे भारतवर्षीय भूवर्णन, रा. मोडक यांचे सौराष्ट्रवर्णन ही पुस्तकें अवलोकनार्ह आहेत. यांशिवाय क्षेत्र- माहात्म्य वर्णनात्मक लहान सहान अनेक पुस्तकें मराठीत प्रसिद्ध झाली आहेत.