पान:वाचन.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८६
वाचन.

शिवाजीमहाराज - संभाजी- राजाराम शाहू - बाळाजी विश्वनाथ- बाजीराव - माधवराव पेशवे - नाना फडणीस - महादजी शिंदे- बापू गोखले - मल्हारराव होळकर, जिवबा दादा बक्षी इत्यादि मराठी रियासतीतील सुप्रसिद्ध पुरुषांची चरित्रं प्रसिद्ध झाली आहेत. अकबर व औरंगझेब या मुसलमानी बादशहांची स्वतंत्र चरित्रे झाली आहेत..
 जगांत इतर देशांत जे अनेक महान् पुरुष उत्पन्न झाले व ज्यांनी इतिहासांत . आपली नांवे संस्मरणीय करून ठेविलीं, अशा नरपुंगवांपैकी जेम्स गाफिल्ड, एब्राहाम लिंकन- आल्फ्रेड श्री ग्रेट पीतर धी ग्रेट-बेंजामिन फ्रांक्लीन- जॉर्ज वाशिंगटन — नेपोलियन बोनापार्ट - ड्युक ऑफ वेलिंगटन - माझिनी ( घाणेकर - कृत ) ग्यारिवाल्डी - डानियल ओकोनेल - लिव्हिंगस्टन-यांची चरित्रे मराठींत झालीं आहेत, ती लहानथोर, स्त्रीपुरुष वगैरे सर्वांनीं वाचण्याजोगी आहेत. तसेच शेक्सपियर, पीट, कॉबडेन, बेकन, मेकॉले, न्यूटन, कार्लाइल, गिबन, हर्बर्टस्पेनसर या लोकोत्तर आंग्ल पुरुषांची चरित्रे, अवश्य वाचण्यासारखी आहेत.
 अहिल्याबाई होळकरीण, झांशीची महाराणी लक्ष्मीबाई, आनंदीबाई जोशी, महाराणी व्हिक्टोरिया वगैरे सुप्रसिद्ध स्त्रियांची चरित्रे झालीं आहेत. स्त्रीरत्नाहार, भारतवर्षीय युवतिरत्नमाला, शूर अबला, ऐतिहासिक स्त्रिया या पुस्तकांत भारतीय सुप्रसिद्ध स्त्रियांची चरित्रे गुंफीलीं आहेत.
 इंग्रजी अमलांत विद्या संपादन करून स्वप्रयत्नाने जे नांवा- रूपास चढले, अशा बहुतेक प्रसिद्ध पुरुषांची त्रोटक चरित्रे मराठीत लिहिली गेली आहेत, कै. नाना मोरोजी, मंडलीक, सर टी माधवराव, का. त्र्यं. तेलंग, न्यायमूर्ति रानडे, आगरकर वगरे गृहस्थांची चरित्रे प्रसिद्ध झाली आहेत. विष्णुशास्त्री चिपळूण- कर यांचे चरित्र जे त्यांच्या बंधूनें लिहिलें आहे, तशा प्रकारची माहितीने 'परिष्द्धत व विश्वसनीय चरित्रे मराठीत नाहींत, असे