पान:वाचन.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठी पुस्तकें.

८५

 होळकर, शिंदे, गायकवाड, नागपूरकर भोसले, आंग्रे, दाभाडे, विंचूरकर वगैरे मराठे सरदार मंडळींनीं आपापल्या घराण्यांचे इतिहास लिहवून प्रसिद्ध केले आहेत. शिवाय जीं लहानलहान विद्यमान संस्थाने आहेत, त्यांचेही इतिहास अलिकडे प्रसिद्ध झाले आहेत, ही मोठ्या आनंदाची गोष्ट होय ! रा. नारायण भवानराव पावगी यांनीं भारतीय साम्राज्य नामक ग्रंथमालिकेंत प्राचीन आर्य लोकांची सुधारणा, त्यांचा धर्म, व्यवहार, कला- कौशल्य, विद्या, व्यापार इत्यादि विविध विषयांची माहिती अनेक ग्रंथांधारें देऊन ती मालिका महाराष्ट्रीयांस अर्पण केली आहे. त्यांच्या ह्या कृतीचें आमच्या अभिज्ञ वाचकांनी अवश्य परिशीलन करावें, अशी त्यांना अगत्याची सूचना आहे.
 चरित्रे. - महीपतीनें आपल्या भक्तिविजय, संतलीलामृत, भक्तलीलामृत या ग्रंथांत प्राचीन साधुसंतांची चरित्रे लिहिली आहेत. जनार्दन रामचंद्र यांनी ' कविचरित्र' नामक पुस्तकांत संकृत, मराठी, कानडी, तेलगु वगैरे कवींचीं चरित्रे व आख्या - यिका लिहिल्या आहेत. कविचरित्र नामक ग्रंथांत रा. आजगांव- कर यांनी कित्येक महाराष्ट्रीय कवींचीं चरित्रे दिली आहेत. कै. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी कविपंचक नामक पुस्तकांत कालिदास, भवभूति, बाणभट्ट, सुबंधु आणि दंडी या पांच- कवींचीं चरित्रे लिहिली आहेत. शास्त्रीबुवांसारख्या मार्मिक लेखकाचें हैं पुस्तक अवश्य वाचण्यासारखे आहे, हें सांगणें नकोच. मराठीतील प्राचीन कवि ज्ञानेश्वर, ( पारख ) एकनाथ, ( सहस्रबुद्धे ) तुकाराम, ( केळुसकर) मोरोपंत, (हंस पांगारकर) वामनपंडित ( हंस ) रामदास वगैरे संतचरित्रे अवश्य वाचण्यासारखीं आहेत.
 गौतम बुद्ध-शंकराचार्य - येशू ख्रिस्त, महंमद - मार्टिन ल्यूथर- नानक- राममोहन राय इत्यादि धर्मसंस्थापकांची चरित्रे मराठीत झाली आहेत.
 (८) ९७२-२५००-२७-७-१००