पान:वाचन.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठी पुस्तकें.

८३

 इतिहास. - इतिहासाची अभिरुचि प्राचीनकाळी आह्मांत फारच थोडी होती, ही मोठ्या दुःखाची गोष्ट होय ! आणि • याचमुळे आमचा प्राचीनकाळचा इतिहास जसा उपलब्ध असावा तसा नाहीं. डा० भांडारकर यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक जो इंग्रजीत दख्खनचा इतिहास लिहिला आहे, त्याचें मराठींत रूपा - न्तर झाले आहे. ग्रांट डफ साहेवाने अस्सल कागदपत्र पाहून जो मराठ्यांचा मोठा इतिहास इंग्रजीत लिहिला आहे, त्याचें भाषांतर क्यापटन डी. केपन यानें मराठींत केले आहे. एलफि. न्स्टनकृत हिंदुस्थानचा इतिहास इंग्रजींत बहुमान्य समजला जातो, त्याचा तर्जुमा कै० मंडलिक यांनी मराठीत केला आहे. टॉड साहेबांच्या राजस्थानच्या इतिहासाची मराठी नक्कल लोक हितवादीने केली आहे. सुराष्ट्र देशाचा इतिहास- गुजराथचा इतिहास - मध्यप्रांताचा इतिहास - महाराष्ट्राचा इतिहास - (चिपळू- णकृत ) दक्षिणेतील मुसलमानी राज्यांचा इतिहास - हे मोठे इतिहास सुप्रसिद्ध असल्यामुळे वाचकांनी ते अवश्य वाचावे. कै. न्यायमूर्ति रानडे यांनी मराठी सत्तेच्या उत्कर्षासंबंधीं जो इतिहास इंग्रजीत लिहिला आहे, त्याचें मराठी रूपान्तर रा. आगाशे यांनी केलें आहे. फेरिस्ताकृत इतिहासाचेंही मराठींत भाषांतर झालें आहे. रा. सरदेसाई यांनी मराठी रियासत, मुसलमानी रियासत व ब्रिटिश रियासत या तीन रियासतीत पुष्कळ माहिती एकत्र करून ठेविलेली आहे. रोमेशचंद्र दत्त यांच्या प्राचीन भरतभूमीच्या इतिहासाचें भाषांतर मराठींत झालें आहे. 'युरोपचें संक्षिप्त इतिवृत्त ' हैं क्रिमनच्या ग्रंथाचें भाषांतर रा. विजापूरकर यांनी केलें आहे.
 अयोध्येचे नबाब, मराठ्यांचे बुंदेलखंडांतील पराक्रम, मुसल- मानी अमदानीतील मराठे सरदार, मराठ्यांचे आरमार, हीं रा. पारसनीस यांची पुस्तकें वाचकांनी अवश्य वाचावीं. लोकहित- वादीकृत ऐतिहासिक गोष्टीत पुष्कळ ऐतिहासिक माहिती दिलेली आहे. आमच्या इतिहासाचें यथार्थ ज्ञान होण्यास व त्यांतील