पान:वाचन.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८२
वाचन.

नवयुग सुधारणेचा मध्यकाल या कादंबन्या वाचण्यालायक आहेत. सौ. काशीबाई कानिटकरकृत 'रंगराव ' ही कादंबरीही बाचनीय आहे. स्वतंत्र, सरस व उदात्त विचारपरिप्लुत अशा कादंबऱ्या मराठीत फारच थोड्या आहेत, असे मोठ्या कष्टानें ह्मणावें लागतें !
 अनाथपांडुरंग, प्रतापसिंह, ठगाची जबानी, मथुरा, मोन- यौवना, शिलादित्य, दुःखाअंतीं सुख, माणिकबाग, वाईकर भटजी, शामभट आणि त्याचा शिष्य बटो, कुवलयपूरची राणी कुमुद्वती या सर्व कादंबऱ्या इंग्रजीवरून मराठीत झाल्या आहेत. पैकीं कित्येक कादंबऱ्यांना इकडील पेहेराव फारच सुरेख बसला आहे. सुप्रसिद्ध बंगाली कादंबरीकार बंकिमचंद्र चतर्जी याच्या कादंबऱ्यांचीं आनंदाश्रम, विषवृक्ष, दुर्गेशनंदिनी, मृणालिनी, कृष्णकांताचें मृत्युपत्र वगैरे मराठीत जीं भाषान्तरे झाली आहेत, तीं वाचकांनीं अवश्य वाचावी. याशिवायही कित्येक बंगाली कादंबऱ्यांची मराठींत भाषान्तरें झालीं आहेत. हिंद आणि ब्रिटानिया, सरस्वतीचंद्र या सुरस गुजराथी कादंबऱ्यांची मराठींत रूपान्तरें झालीं आहेत.
 पंचतंत्र, हितोपदेश यांची मराठीत भाषान्तरे झाली आहेत. मुक्कामाला ही सुरस कादंबरी वाचण्यालायक आहे. गलीव्हरचा वृत्तांत, इसापनीति, अरेबियन नाइट्स ह्या अद्भुत गोष्टी मराठींत झाल्या. कित्येक कादंबऱ्यांत कल्पनाशक्ति उच्च प्रकारची नसल्या- मुळे त्या व्हाव्या तशा झाल्या नाहींत. या काळीं अद्भुत गोष्टी जरी लोकांना फारशा रुचत नाहींत, तरी लेखकाच्या कल्पना- शक्तीचा प्रवाह प्रबळ असल्यास अशा अद्भुत कादंबऱ्यांनासुद्धां इसापनीति, अरेबियन नाईट्स यांप्रमाणे अत्यंत मोहक व बोधपर स्वरूप प्राप्त होतें. निर्णयसागर छापखान्याचे मालक व वा. मो. पोतदार यांनी पुराणे, नाटकें, काव्यें यांतील अनेक सुरस पौराणिक कथानकांचीं मराठींत सुबोध भाषांतरें करवून छापिली आहेत,