पान:वाचन.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठी पुस्तकें.

८१

भूमीवर आली असून ती भाविक लोकांस विशेष प्रिय झाली आहेत. परंतु ग्रंथदृष्ट्या या नाटकांत चरित्रांपेक्षां कांहीं विशेष असेल, असें आह्मांला वाटत नाहीं.
 कादंबऱ्या. --- कादंबऱ्या वाचण्याकडे लोकांचा विशेष कल असल्यामुळें वाङ्मयांत त्यांना प्रमुख स्थळ मिळावे, यांत नवल नाहीं. ऐतिहासिक आणि सामाजिक असे कादंबऱ्यांचे स्थूल- मानाने दोन भेद करतां येतील. नाटकाप्रमाणेंच मराठी कादं- बयांना पौराणिक गोष्टी, प्राचीन कादंबऱ्या, ऐतिहासिक प्रसंग व पाश्चात्य कादंबऱ्या या ठिकाणांहून बरीच मदत झाली आहे. आर्य चाणक्य, चंद्रगुप्त, कर्पूरमंजरी, बृहत्कथासागर, वगैरे प्राचीन कादंबऱ्या मराठीत असल्यामुळे आपली प्राचीन- काळची स्थिति अंशत: तरी समजण्यास मराठी वाचकांना सोय झाली आहे. कादंबरी, दशकुमार चरित, नागानंद, विश्वगुणा- दर्श वगैरे संस्कृत कादंबऱ्या मराठीत झाल्या आहेत.
 ऐतिहासिक कादंबऱ्या लहानथोर, स्त्रीपुरुष या सर्वांना वाचण्यालायक असतात. पानिपतची मोहीम, लक्ष्मी व सरस्वती, शिवछत्रपति, देवीसत्यभामा, प्रतापसिंह, हिंदुस्थानांतल्या योदयांच्या गोष्टी, करणवाघेला, बाजीराव, भरतपूरचा वेढा, जिंजीवास, मोचनगड, हंबीरराव व पुतळाबाई, केवळ स्वराज्या- साठीं, रूपनगरची राजकन्या, उप: काल, चंद्रगुप्त, शंकरदेव, गड आला पण सिंह गेला, वगैरे ऐतिहासिक कादंबऱ्या लोक- प्रिय झाल्या असून वाचण्यालायक आहेत.
 सामाजिक कादंबऱ्या जरी मराठींत पुष्कळ आहेत, तरी त्यांत चांगल्या अशा फारच थोड्या आहेत, आजकालच्या गोष्टींपैकी 'मधली स्थिति, ' 'पण लक्षांत कोण घेतो?" जग असें आहे,' 'मी' वगैरे रा. रा. हरि नारायण आपटे यांच्या कादंबऱ्या अवश्य वाचण्या- लायक आहेत. गोविंदराव अथवा सुशिक्षणाचें फळ, ताराबाई हिराबाई, शिरस्तेदार, ठगाची जबानी, वेणू, यशवंतराव खरे, नारायणराव आणि गोदावरी, सद्गुणी सून, धाकट्या सूनबाई,