पान:वाचन.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठी पुस्तकें.

७५

विवेचन झालें, तरच तो निबंध पूर्ण होईल, एरवी होणार नाहीं. तसेंच जे तरुण आहेत किंवा वाङ्मयाशीं ज्यांचा विशेष परिचय नाहीं, अशा वाचकांची वाङ्मयाशी ओळख करून देणें, हैं येथे आवश्यक आहे. प्रस्तुत निबंध मराठी भाषेत असल्यामुळें मराठी ग्रंथांसंबंधी यांत विवेचन झालें पाहिजे. परंतु तो विषय स्वतंत्र असून प्रकृत निबंधाचा तिप्पट किंवा चौपट विस्तार होऊनही त्याची पूर्णता होणार नाहीं. तथापि वाचकांच्या सोई- करितां मराठी वाङ्मयविषयक ग्रंथांविषयीं येथें जें अगदीं थोडक्यांत दिग्दर्शन केलें आहे, त्यावरून मराठी भाषेतील बहुतेक चांगल्या पुस्तकांची वाचकांस ओळख होईल अशी दृढतर आशा आहे.
 मराठीतील वेदान्तावर सर्वमान्य असा ग्रंथ हाटला हाणजे 'ज्ञानेश्वरी' होय. सामान्य वाचकांना ज्ञानेश्वरी समजण्यास जरी कठिण आहे, तरी गुरुमुखाच्या साहाय्याने एकदां ती समजली झणजे मनास आनंद झाल्यावांचून राहणार नाहीं. ज्ञानेश्वराचा 'अमृतानुभव' नामक जो वेदांतपर स्वतंत्र ग्रंथ आहे तो वाचण्या- सारखा आहे. नामदेव हा ज्ञानेश्वराचा समकालीन असून महान् भगवद्भक्त होता. याच्या अभंगांत भक्तिरस विशेष आहे. ज्ञानेश्वराच्या मागाहून सुमारे तीनशे वर्षांनी एकनाथ झाला. एकनाथाचे भागवत, भावार्थरामायण, रुक्मिणीस्वयंवर वगैरे ग्रंथ आहेत. त्यांत भागवत हा ग्रंथ अवश्य वाचण्यासारखा आहे. एकनाथाची भाषा प्रौढ व रसभरित आहे. मुक्तेश्वराची भाषा रसपरिप्लुत व हृदयंगम आहे. त्याची वर्णनशैली एवढी अप्रतिम आहे कीं, त्याच्या ग्रंथांतील वर्णनें वाचीत असतां ते देखावे प्रत्यक्ष आपल्या नजरेसमोर आहेत की काय, असा वाचकांना भास होतो. याचे महाभारत व रामायण हे ग्रंथ सर्व- मान्य असून वाचनीय आहेत. तुकाराम हा महान् भगवद्भक्त साधु होता. याची अभंगांची गाथा ही मराठी वाचकांना सर्वो कुष्ट देणगी आहे. ज्यास तुकारामाचा एखादा किंवा अर्धा