पान:वाचन.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७४
वाचन.

असे नाहीं. व्यवहाराची व दररोजच्या घडामोडींची साधारणतः माहिती असणें अवश्य असल्यामुळे वर्तमानपत्रांचे वाचन अवश्य पाहिजेच, परंतु नुसती वर्तमानपत्रे वाचून मन कधीही सुसंस्कृत व्हावयाचें नाहीं. तें संस्कृत होण्यास सर्व प्रकारच्या वाङ्मय ग्रंथांचा अवश्य अभ्यास केला पाहिजे. जे विद्यार्थी आहेत, त्यांनी वर्तमानपत्रे वाचण्यांत आपला अमोल वेळ न घालवितां आपल्या अभ्यासांत निमग्न राहून वाङ्मयांतील उत्तमोत्तम ग्रंथांचा अभ्यास करण्यांत वेळ खर्च केल्यास त्यांना विशेष फायदा होईल, ह्यांत संशय नाहीं.
 भाषाशास्त्र. - भाषेचें मार्मिक व सोपपत्तिक ज्ञान होण्यास भाषेचा इतिहास, व्याकरण, शब्दव्युत्पत्ति, वाक्यरचना, भाषा- सांप्रदाय, ह्मणी, अलंकार, वगैरे विषयांचे सांगोपांग ज्ञान झाले पाहिजे. पूर्ववयांत हा अभ्यास झाल्यास पुढे मार्मिकतेनें ग्रंथ वाचतां येतात; इतकेंच नाहीं, तर चांगल्या वाईट पुस्तकांची आपणास सहज निवड करतां येते. त्यामुळे लहानपणापासून भाषेचें उत्तम व मार्मिक ज्ञान होर्ते आणि पुढें लिहिण्यांत आणि भाषणांत त्याचा आपणास विशेष उपयोग होतो. लेखन- व्यवसायी मनुष्यांना भाषाशास्त्राचा अभ्यास अत्यंत आवश्यक असल्यामुळे तो त्यांनीं पूर्ववयांतच केला पाहिजे


भाग ९ वा.
मराठी पुस्तकें.

येथवर वाचन ह्या विषयाचे सामान्य विवेचन झाले. कोण- त्याही भाषेतील पुस्तकें वाचतेवेळी येथवर सांगितलेल्या मुद्यांचा वाचकांस पुष्कळ उपयोग होईल. वाचन हाटलें कीं, अगो. दर ग्रंथसंग्रह कसा आहे, त्यांत उत्तम व वाचण्यालायक असे कोणते ग्रंथ आहेत, त्यांत न्यूनता काय आहे इत्यादि गोष्टींचें