पान:वाचन.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाङ्मय.

७३

विषयांवर कोश इंग्रजी भाषेत झाले आहेत. वाचतेवेळी, लिहिते- वेळी किंवा भाषण करण्यापूर्वी, आपणास कोणत्याही विषयाची माहिती पाहिजे असल्यास ती अशा ग्रंथांत पहावी, ह्मणजे आपल्या कामास त्यापासून बरीच मदत होते. जेव्हां कोणत्याही गोष्टीसंबंधानें आपणास माहिती पाहिजे असते, तेव्हां ती अशा ग्रंथांपासून थोडीफार तरी मिळतेच. फुरसदीच्या वेळीं असे ग्रंथ पाहण्याचा परिपाठ ठेविल्यास त्यामुळे आपणास विविध विषयांची माहिती मिळून आपले मन सुसंस्कृत होईल यांत संशय नाहीं.
 मासिक पुस्तकें. - ही वाङ्मयाचा एक भाग झाली आहेत. मासिक पुस्तकांत विविधप्रकारचे लेख येतात, टीकात्मक लेखांना त्यांत स्थळ असतेच. त्यांतील लेख विचारपूर्वक आणि काळजीनें लिहिलेले असतात. प्रचलित मतांची दिशा ठरविण्या- कडे त्यांचा विशेष उपयोग होतो. करमणुकीकरितां हाणून जीं मासिक पुस्तकें असतात, त्यांत मनोरंजक माहिती व गोष्टी यांनाच विशेषतः स्थळ मिळतें.
 वर्तमानपत्रे. -- वर्तमानपत्रांचे माहात्म्य एकुणविसाव्या शत- काच्या उत्तरार्धापासून अति वाढले आहे. लोकसत्तात्मक राष्ट्रांत वर्तमानपत्रांकडे लोकमताचें नायकत्व आले आहे. विशिष्ट संस्था, चळवळी किंवा विषय यांच्या अभिवृद्धीकरितां कित्येक वर्तमानपत्रें चालविली जात आहेत. दररोजच्या घडामोडी, व्यापारधंदे, राष्ट्रा हिताहित यांचा दररोज खल चालू असल्यामुळे, वर्तमान- पत्रांना विशेष महत्व येऊन त्यांना वाङ्मयांत स्थळ प्राप्त झालें आहे. वर्तमानपत्रांत प्रचलित विषयांचाच विशेषतः उहापोह होत असल्यामुळे कांहीं दिवसांनीं तीं शिळी होतात. वर्तमान- पत्रांतूनही कधीं कधीं विशेष मनन करण्यासारखे विषय येतात, नाहीं
 (७) ९७२ - २५०० - २०-७-१०