पान:वाचन.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७२
वाचन.

 १०. टीकात्मक ग्रंथ. - ईश्वरानें मनुष्याच्याठायीं जी सदसद्विवेक बुद्धि ठेविली आहे, तीतच टीकात्मक प्रवृत्तीचा उगम ठेविला आहे. या चिकित्सात्मक प्रवृत्तीनेच मनुष्यास सत्य व विविध प्रकारचे ज्ञान प्राप्त झालें आहे. प्रत्येक मनुष्य टीकाकार आहे. परंतु स्वतंत्र विचार करून टीका करणारे फारच थोडे असून दुसन्यांचे विचार घेऊन त्यांचा अनुवाद करणारेच लोक फार असतात ! कोणत्याही गोष्टीवर योग्य टीका करतां येणें हें काम फार कठिण आहे. असो. वाङ्मयास शुद्ध व व्यापक स्वरूप आणण्यास, उत्तम ग्रंथांचा गौरव वाढविण्यास, नीरस ग्रंथांचा प्रसार कमी करण्यास, हे टीकात्मक ग्रंथच विशेष कारणीभूत झाले आहेत. टीका ही कसोटी असून या कसोटीच्या कसासे जे ग्रथ उतरतात, त्यांचीच किंमत वाढते. जे बुद्धिमान आहेत, ज्यांचें वाचन दांडगे आहे, अशा अधिकारी लोकांनी टीकात्मक ग्रंथ लिहावे आणि अशांच्याच ग्रंथांना विशेष मान द्यावा; परंतु टीकात्मक ग्रंथ किंवा लेख लिहिणारे सर्वच अधि- कारी असतात असें नाहीं, आणि यामुळेच कोणत्याही गोष्टीचें किंवा ग्रंथाचें पूर्ण विवेचन होण्यास अनेक टीकात्मक ग्रंथ व्हावे लागतात. अगोदर मूळ ग्रंथ किंवा मूळ गोष्ट समजून घेऊन मग टीकात्मक ग्रंथ वाचण्याचा परिपाठ ठेवावा. जे नांवाजलेले ग्रंथ असतील ते अवश्य वाचावे. ते फार लक्ष्यपूर्वक वाचावे, नाहीतर ग्रंथकारांच्या स्वाधीन होऊन आपण विकारवश होऊं व आपली मतें भलत्याच मार्गाकडे वाहवली जातील!
 सर्व विद्यांचे कोश.~~(Encyclopedias ) बृहत्कोश विश्वकोश, इत्यादि संपूर्ण माहितीचे कोश आपल्या मराठी भाषेत जरी फारसे झाले नाहींत, तरी पाश्चात्य भाषांत झाले आहेत. एक एका विषयावर संपूर्ण माहितीचे असे विविध