पान:वाचन.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाङमयः

६९

आपले चरित्र संस्मरणीय करावें, असें वाटतें. तो मनुष्य प्रथम आपल्यासारखाच असून पुढें तो उदयास आला, तसे आपणही प्रयत्न केला असतां उदयास येऊ, अशी क्षणभर मनाला खात्री वाटते, चरित्रे वाचावयास फार चांगलीं तीं लहन-थोरांनी, स्त्रियांनी, पुरुषांनी, सर्वांनी वाचावीं. लँगहॉर्न याने एके ठिकाणी छाटलें आहे कीं, 'चरित्रे ही लागवड करण्यास जितकीं योग्य आहेत, तितके इतर कोणतेही ग्रंथ योग्य नाहींत. ' तसेंच टॉमस कार्लाइल यानें झटलें आहे की, ' वाचनांत सर्वतोपरी उपयुक्त व अति चांगले वाचन हाटले म्हणजे चरित्रग्रंथांचे होय ' चरित्रे आपणांस उत्तम मंडळींची ओळख करून देतात, आपल्या आंगी वीरश्री व उत्साह उत्पन्न करतात व जे महात्मे स्वप्रय- ना श्रेष्ठ पद पावले आहेत, अशांच्या अगदी जवळ आणून सोडितात.
 ६. प्रवासवर्णने व स्थलवर्णनें. – यांच्या वाचनापासून मनो- रंजन होऊन अन्य ठिकाणची माहिती मिळते. विविध देशांच्या लोकांच्या चालीरीति, त्यांचे व्यवहार व सत्यासत्य समजण्याची जिज्ञासा उत्पन्न होते. मन उदात्त होऊन आपल्या राष्ट्राचे आपल्या समाजाचे गुणावगुण व हितानहित हीं कळू लागतात. पूर्वी अध्ययन संपल्यावर एक दोन वर्षे तीर्थयात्रा करण्यांत ( प्रवासांत ) घालवून नंतर आपले लोक जगांतील व्यवहारास लागत असत. धर्मश्रद्धेनें केवळ नव्हे तर ज्ञानार्जनाकरितां म्हणून प्रवास करणें आवश्यक होय. इंग्लिश, अमेरिकन, जर्मन वगैरे पाश्चात्य देशांतील लोकांत प्रवास करण्याची जशी प्रवृत्ति दिसून येते, तशी आपणांत नाहीं, ही मोठ्या दुःखाची गोष्ट होय ! आणि यामुळेच प्रवास व स्थलवर्णनात्मक ग्रंथ आपल्या मराठी भाषेत फार थोडे आहेत.