पान:वाचन.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६८
वाचन.

मनुष्यस्वभावाचें ज्ञान होतें. आपली योग्यता काय, परिस्थिति काय, हें चांगलें समजल्यामुळे काळास अनुसरून असे वर्तन आपणास करण्यास ठीक पडते, इतिहासांतील गोष्टी खन्या अस- ल्यामुळे त्यांत सत्याचा भाग जेवढा असतो तेवढा कादंबरीत असत नाहीं. कारण कादंबन्या काल्पनिक असतात.

५. चरित्रे.- उन्नत जीवित यात्रा, पदचिन्हें कालरूप सिकतेत । भरतांना आम्हांला मागें येतील ठेवितां खचित ॥ *

काव्यरत्नावलि.

 जगांत कोट्यवधि मनुष्ये जन्मतात आणि कालीनुसार मृत्यु पाय- तात, त्या सर्वांचीच चरित्रे लिहिण्यासारखी असतात असें नाहीं. आपल्या अंगच्या विशेष विद्वत्तेने किंवा सद्गुणांनी जगांतील साधारण मनुष्यांपेक्षां अलौकिक कृत्ये करून ज्यांनी आपली चरित्रें संस्मरणीय केलीं आहेत, असे जे जगाच्या प्रत्ययास आणून दाखवितात, अशांचीच चरित्रे बहुधा लिहिली जातात. संस्कृतांत म्हटलें आहे की, ' स्वदेशे पूज्यते राजा विद्वान् सर्वत्र पूज्यते राजे जे आहेत त्यांना त्यांच्या छत्राखाली असलेली प्रजा विशेष मान देते, परंतु जे विद्वान् आहेत ते सर्वत्र ठिकाणी पूज्य व वंदनीय होतात. आपण एखादें चरित्र वाचू लागलों ह्मणजे चरित्रनायकावरील प्रसंग, त्यानें भोगिलेला त्रास किंवा छळ, त्याचें धैर्य, त्याची धर्मश्रद्धा, त्याचा निश्चय, त्याची विद्वत्ता, त्याची कळकळ वगैरे अनेक गुण वाचून आपल्या मनावर फारच चांगला ठसा उमटतो. आपणही तसें व्हावें व


Lives of great men all remind us
We can make our lives sublime,
And departing leave behind us
Foot-prints, on the sands of time.

Longfellow