पान:वाचन.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७०
वाचन.

 ज्यानां प्रवास करण्याची ऐपत आहे, त्यांनी अवश्य प्रवास करावे; परंतु ज्यांना तशीं साधनें नाहींत, त्यांनी प्रवास व स्थल- वर्णनात्मक जे सर्वमान्य ग्रंथ आहेत ते अवश्य वाचावेत, चरित्र - ग्रंथांप्रमाणेच हे ग्रंथही सर्वांना वाचण्यास अति योग्य आहेत.
 ७. निबंध. - वाचण्यास अगोदर भूमिका बरीच तयार असावी लागते व शिवाय विविध विषयांसंबंधीं प्रथम थोडी फार माहितीही असावी लागते. कोणत्याही विषयाच्या समर्थनार्थ, निरसनार्थ किंवा प्रस्थापनार्थ निबंध लिहिलेले असतात. हें तत्व ध्यानांत ठेवून निबंध वाचले तरच ते समजतात व त्यांपासून ज्ञानप्राप्ति होते. ते वाचतांना सत्यासत्य गोष्टींचा आपण अवश्य विचार केला पाहिजे व ज्या योग्य असतील त्या ध्यानांत ठेवल्या पाहिजेत. निबंधांतही सरस आणि नीरस प्रकार असून वाचण्याकरितां त्यांची निवड फार विचारपूर्वक केली पाहिजे. निबंध वाचण्यापासून विशेष ज्ञान प्राप्त होते व आपल्या विचारांना वळण लागून ते योग्य, सुदृढ व व्यापक बनतात.  ८. कथापुराणें - प्रत्येक धर्मात तीन प्रकारचे ग्रंथ असतात. - (१) तत्त्वज्ञान, (२) कथापुराणे, (३) विधि. धर्मातील तत्त्वज्ञान व अनुज्ञा जडमूढ लोकांना कळाव्या, त्यांच्या नजरे - समोर उदात्त उदाहरणं रहावी म्हणून कथापुराणांची योजना केलेली असते. अशा कथापुराणांपासून बोधामृत मिळत अस- ल्यास ती वाचणें अत्यंत श्रेयस्कर होय. परंतु पुराणांतील रहस्याकडे मुळींच लक्ष न देतां अंधश्रद्धेनें त्यांना नसतें महत्व देऊन त्यांचे स्तोम माजविण्याची चाल अनेक धर्मपंथांत आढळून येते. कथापुराणांतील रहस्य कळो वा न कळो, तीं बोधपर असोत वा नसोत, ती श्रद्धेनें वाचण्यांत अमित पुण्य आहे, असा पुष्कळ लाकांचा भ्रामक समज असतो ! अशा अंधश्रद्धेने ते ग्रंथ