पान:वाचन.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाङ्मयः

६७

कित्येकांचा समज असतो. परंतु तो समज साफ चुकीचा आहे ! इतिहासाचे खरे मर्म हाटले ह्मणजे घडलेल्या गोष्टींचा कार्य- कारणभाव समजणें आणि त्यापासून पुढील स्थितीवर काय परिणाम झाले आहेत किंवा होणार आहेत, याविषयीं बरोबर अनुमान करतां येणें, हैं होय. इतिहासापासून दुसरा एक फायदा होतो तो हा कीं, त्यापासून आपणांस मनुष्यस्वभावें ज्ञान होतें. पूर्वी आपली स्थिति कशी होती, हल्लीं कशी आहे, आपली योग्यता केवढी आहे, इत्यादि गोष्टी इतिहासापासून कळतात. प्रथम आपणांस आपला इतिहास पूर्ण अवगत असला पाहिजे. नंतर ज्या लोकांशी आपला रात्रंदिवस संबंध जडला आहे, त्यांचाही इतिहास माहीत असणें अवश्य आहे. याशिवाय प्राचीन राष्ट्रें व जगांतील इतर अर्वाचीन राष्ट्रे यांचाही इतिहास वाचला असतां त्यापासून फायदा होणार आहे. समजा, आपणास एखाद्या राष्ट्राचा इतिहास वाचावयाचा आहे, तर प्रथम त्या राष्ट्राच्या इतिहासास जेथून आरंभ होतो, तेथून वाचावयास सुरुवात करावी व नंतर पुढे क्रमशः वाचीत जावा. जरी त्यांत आपण एखाद्या पुरुषाचें चरित्र किंवा एखाद्या लढाईचें वर्णन वाचीत असलो, तरी त्या वेळची पूर्ण परिस्थिति नेहमी लक्षांत असू द्यावी. हाणजे त्यापासून इतिहासवाचनावर बराच प्रकाश पडून आपल्याही ध्यानांत तो भाग बराच राहतो आणि आपली मतेंही बरोबर बनतात.
 इतिहासापासून मनोरंजन होऊन सद्बोध होतो; " इतिहास हा प्रत्यक्ष उदाहरणें दाखवून केलेला तत्वबोध होय !" असें एका प्रसिद्ध ग्रंथकारानें म्हटलें आहे. तसेंच त्यापासून सत्कृत्या- बद्दल आवड आणि दुष्कृत्याबद्दल तिरस्कार मनांत उत्पन्न होतो. आगीं धैर्य येते. प्रसंग आला असतां मनुष्य डगमगत नाहीं.