पान:वाचन.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६६
वाचन.

अवगत असून तिचा लोकशिक्षणाच्या कामी फार उपयोग आहे, अशी त्यांची खात्री होती. कवि किंवा कादंबरीकार आपल्या लेखणीनें जो ठसा वाचकांच्या मनांवर वठवितात, तोच नाटक- कार आपल्या कृतीस ( नाटकास ) रंगभूमि, नट, पोशाख, पडदे इत्यादि अनेक साधनांचे साहाय्य घेऊन प्रेक्षकांच्या मना- घर वठविण्याचा प्रयत्न करतात. हृश्य वस्तूंचे भरपूर साहाय्य मिळाल्यामुळे ' अधिकस्य अधिकं फलम्' या उक्तीप्रमाणें त्यांची कृति अज्ञ व मूढ जनांपासून तो विद्वन्मुकुटमणीपर्यंत सर्वांस प्रिय होते. नाटकाची भाषा तुटक असल्यामुळे साधारण लोकांस समजण्यास ती अंमळ कठीण पडते. नाटकें अगोदर वाचून नंतर ती पाहिली असतां चांगलीं समजतात. जीं उत्तम व सर्वमान्य नाटके असतील, तोंच वाचावीत. नीरस व अश्लील नाटके वाचून काळाचा अपव्यय करण्यांत कांही अर्थ नाहीं.
 ४. इतिहास. ह्मणजे घडलेल्या गोष्टींचें टिप्पण; मग त्या गोष्टी एखाद्या राष्ट्रासंबंधी, क्रांतिमूलक महागोष्टीसंबंधी, एखाद्या संस्थेसंबंधीं किंवा शास्त्रासंबंधी असोत. इतिहासांत कार्यकारण- भावाचेंही विवेचन केलेलें असतें. मनुष्याच्या सर्व उन्नतीचा पाया अनुभवावर अवलंबून असून, तो अनुभव इतिहास - शास्त्रांत नमूद केलेला असतो; ह्मणूनच इतिहासाची किंमत जगांत विशेष समजली जात आहे. मागील लोकांस कशा अडचणी आल्या, त्यांजवर कोणकोणती संकटें आलीं, त्यांतून त्यांचा कसा बचाव झाला, हल्लींची स्थिति कशी आहे, पुढें स्थिति कशी होईल, इत्यादि सर्व गोष्टी इतिहासावरून कळतात. इतिहास वाचण्यात बहुतेक लोकांचा फार घोंटाळा होऊन तो बरोबर न समजल्यामुळे विशेष कंटाळवाणा होतो. सन, तारखा, नांवें, थळेही बरोबर सांगतां आली ह्मणजे इतिहास आला, असा