पान:वाचन.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाङ्मय.

६५

रास अपाय होतो, तसें दुर्वृत्ति प्रक्षुब्ध करणा-या कादंबऱ्याही नेहमी वाचणे इष्ट नाहीं त्यांपासून मनावर अनिष्ट परिणाम झाल्याखेरीज राहत नाहीं.
 मनुष्यास करमणूक पाहिजे व करमणुकीकरितां चांगल्या कादं- बन्या वाचण्यास हरकत नाहीं. परंतु निरंतर त्या वाचून जे आपला अमोल वेळ व्यर्थ दवडितात, ते अधिक अनुभविक व अत्युपयुक्त ग्रंथांकडे दुर्लक्ष करितात, व त्याबद्दल त्यांची जेवढी कीव करावी तेवढी थोडीच होणार आहे ! असल्या वाचनांत ते जो वेळ घालवितात व श्रम घेतात, त्या मानानें त्यांना मोबदला मुळींच मिळत नाहीं.क्षणभर मनरंजन होतें, यापलीकडे त्यांना फारच थोडा फायदा होतो. इतर ग्रंथांच्या वाचनापासून जशी मनाची मशागत होते, बुद्धि वाढते, पुष्कळ माहिती मिळते, तशी अशा ग्रंथांपासून मुळींच होत नाहीं. विद्यार्थ्यांनी लहानपणी कादंबऱ्या वाचण्याच्या नादी न लागतां काव्यें, चरित्रें, निबंध व बोधपर गोष्टी वाचाव्यात. सत्यासत्य निर्णय करण्याची शक्ति अंगीं येऊन मतें ठाम झालीं ह्मणजे मग कादंबऱ्या वाचण्यापासून त्यांच्या मनावर अनिष्ट परिणाम होण्याची भीति राहणार नाहीं.

३. नाटकें.—यो यो स्वभावो लोकस्य सुदुखःखसमन्विताः ।
सोऽङ्गादभिनयोपेतो नाट्यमित्यभिधीयये ॥ भरतमुनि,

 नाटके करण्याची चाल आपल्या देशांत फार प्राचीनकाळा- पासून आहे. कालिदासाची नाटकें राजदरबारी होत असत. भवभूति यास राजाश्रय नसल्यामुळे त्याची नाटकें यात्रेत होत असत. मोठ्या सणांत किंवा महोत्सवांत नाटके करण्याचा प्रघात असे. प्राचीन ग्रीक व रोमन लोकांस नाट्यकला पूर्ण