पान:वाचन.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६४
वाचन.

असत्याविषयी तिरस्कार इत्यादि गोष्टी कादंबन्यांत सांगितल्या असल्यास त्यांस कोण बरें नांवे ठेवील ? फार तर काय, ज्या कादंबऱ्या मनोरंजनाकरितांच लिहिलेल्या असून ज्या निरुपद्रवी असतील व ज्यांपासून वाचकांच्या मनावर अनिष्ट परिणाम होणार नाहींत, अशा कादंबऱ्यांनासुद्धां वाईट हाणण्यास कोणीही सहसा धजणार नाहीं.
 परंतु सर्वच कादंबऱ्या अशा धोरणानें लिहिलेल्या असतात, असें नाहीं. पुष्कळ कादंबऱ्यांतून असंभाव्य, असत्य व अश्लील गोष्टी लिहिलेल्या असल्यामुळे त्यांचा वाचकांच्या मनावर वाईट परिणाम होतो. वाचकांच्या उच्च मनोवृत्ति जागृत न होतां त्यापासून क्षुद्र मनोवृत्ति मात्र प्रक्षुब्ध होतात. विचारांपेक्षां विकारांचीच ते अधिक प्रवृत्ति करितात. खून, दरोडे, रस्ते- लुटी, तसेंच व्यभिचार, लुच्चेगि-या, कावेबाजपणा इत्यादि निंद्य गोष्टींचे तिखटमीठ लावून वर्णन करून आपल्या कादंबऱ्या जितक्या अधिक मनोरंजक होतील, तितक्या त्या करण्याचा प्रयत्न कित्येक कादंबरीकार करूं लागले आहेत व असल्या कादंबऱ्या सामान्य लोकांना विशेष प्रिय होऊन त्यांचा पुष्कळ खप होतो, असा अनुभव असल्यामुळे अशा कादंबऱ्या लिहि- यांत त्यांना अधिक उत्तेजन मिळत आहे. असल्या कादंबऱ्या मुळींच प्रसिद्ध न होतील तर बऱ्या. ज्या गोष्टी पाहून किंवा ऐकून अंगावर रोमांच उभे राहतात, अश्लील लांबलचक वर्णनें वाचून आपले मन तल्लीन होते व वाईट वाटण्याचे एकीकडे- सच राहून असे ग्रंथ वाचण्याची चटक लागते. असे ग्रंथ नेहमी आपल्या वाचनांत आले ह्मणजे त्यांपासून आपल्या वर्त- नावर अनिष्ट परिणाम होतो. मेवामिठाई किंवा मसाला घात- लेले पदार्थ जसें दररोज खाणे चांगलें नाहीं, त्यांपासून शरी