पान:वाचन.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाङ्मय.

६३

कठीण नसल्यामुळे कोणासही त्या विषयावर साधारणतः थोडेफार लिहितां येतें आणि त्यामुळे नीरस आणि हलक्या प्रतीच्या कादंबऱ्या पुष्कळ अस्तित्वांत येतात ! परंतु ज्याप्रमाणें श्रेष्ठ प्रतीचे कवि थोडे, त्याप्रमाणे श्रेष्ठ प्रतीचे कादंबरीकारही थोडेच निपजतात.
 कादंबन्या वाचणे चांगले किंवा वाईट, याविषयीं बराच मतभेद आहे आणि तो असण्यास सबळ कारणेही आहेत. त्यांविषयीं आह्मांस येथे थोडेसें दिग्दर्शन केलें पाहिजे, रूपके, दृष्ठांतरूप कथा किंवा कल्पित गोष्टी सांगून श्रोत्यांची मने वळ- विण्याचा प्रकार फार प्राचीन काळापासून चालत आला आहे. महाभारतासारख्या प्राचीन ग्रंथांतही रूपकें किंवा दृष्टांतरूप कथा आढळून येतात. गौतम बुद्ध, साक्रेटीस, येशू ख्रिस्त वगैरे महात्मे दृष्टांतरूप गोष्टी सांगून लोकांची मने वळवीत व त्यांच्या हृदयांत ज्ञानाचा प्रकाश पाडीत असत. कोणतीही तत्वें दृष्टान्तरूपाने जितकी मनांत बिंबतात, तितकीं ती केवळ तात्विक विवेचनानें मनांत उतरत नाहींत, हा अनुभव सर्वोना आहेच. कादंबऱ्या या दृष्टांतरूप कथा किंवा गोष्टी होत. शौर्य, साहस, प्रेम आणि व्यावहारिक गोष्टी या विषयांवर बहुधा कादंबन्या लिहिण्याचा प्रघात आहे. परंतु अलिकडे विविध विषयांचाही कादंबऱ्यांत संग्रह होऊं लागला आहे. दृष्टांतरूप कथांपासून जसें पुष्कळ शिकण्यासारखे असतें, तसें कादंबऱ्यांपासूनही असतें. ऐतिहासिक गोष्टी, नीति- सिद्धांत, धर्माचरण, व्यवहारज्ञान, स्वभाव वैचित्र्य, दूरदर्शीपणा, उद्योग वगैरे अनेक अत्यंत उप- युक्त गोष्टी ज्या कादंब-यांपासून शिकतां येण्यासारख्या अस- तात, अशा कादंबऱ्यांची जेवढी प्रशंसा करावी, तेवढी थोडीच होणार आहे. सत्याविषयीं प्रीति, सत्याकरितां सोसलेली संकटें,