पान:वाचन.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६२
वाचन.

ठिकाणी जो इशारा दिला आहे, तो ध्यानांत ठेवण्यासारखा आहे. तो म्हणतो, " ज्यांच्याकडे स्वदेशहिताची जबाबदारी आहे, त्यांनी संगीतावर सख्त नजर ठेविली पाहिजे; कारण मर्यादेचें अथवा कायद्याचे उल्लंघन, कोणाच्याही लक्षांत न येतां, प्रथमत: करमणुकीच्या रूपानें या संगीताचे द्वारा होऊं लागतें. अमर्याद- पणा अथवा उच्छृंखलपणा यांचा या द्वारानें मनांत प्रथम शिरकाव होतो आणि मग हळूहळू रीतभात व वागणूक यांवर त्याचे अनिष्ट परिणाम दृष्टीस पडूं लागतात." संगीत नाटकांतील अश्लील पदें आणि शृंगारविषयक लावण्या व पदें यांचा आमच्या समाजांत बराच प्रसार झालेला आढळून येत आहे, ही मोठी दुःखाची गोष्ट होय व त्यापासून होणारे अनिष्ट परिणाम जरी स्पष्ट कळून आले नाहींत, तरी ते झाल्याशिवाय कधी राहणार नाहींत !
 २. कादंबन्याः - ज्यांना लिहिणे, वाचणें येतें, अशा साधा- रण लोकांची करमणुकीची पुस्तकें हाटलीं ह्मणजे कादंबऱ्या होत. कवीची जेवढी योग्यता आहे, तेवढीच कादंबरीकाराची आहे. काव्यापेक्षां कादंबऱ्या लोकांस विशेष प्रिय होतात, याचे कारण असें कीं, कादंबरीत संसाराचीं व मनुष्यस्वभावाची चित्रे रेखा- टलेली असतात. काव्यांत तीं नसतात असें नाहीं, परंतु त्यांत अशात ज्ञानाचा किंवा तत्वज्ञानाचा भाग विशेष असतो. मनुष्यस्वभावास तत्वज्ञान विशेष आवडत नसून ज्या गोष्टींत मानवी प्राण्यांची हकीगत, त्यांचा इतिहास, त्यांचीं सुखदुःखें, त्यांच्यावरील घोरप्रसंग इत्यादि गोष्टी असतात, अशा गोष्टी वाचते वेळी किंवा ऐकते वेळी त्यांच्या मनोवृत्ति तल्लीन होतात; त्याच्या आंगावर रोमांच उभे राहतात; किंवा त्यांस आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. कादंबरी लिहिणे फारसे