पान:वाचन.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाङ्मय.

६१

तुकाराम व मोरोपंत ह्या कवींच्या काव्यांची आठवण झाल्या- शिवाय राहत नाहीं. सूर्यकिरणांच्या तापामुळे विव्हल झालेल्या प्रवाशास ज्याप्रमाणे भव्य व गर्द छायेचा आम्रवृक्ष आपल्या छायेनें आनंद देतो, आपल्या मुळांच्या योगानें आजूबाजुची जमीन घट्ट थोपून धरतो व छायेच्या खालच्या जमिनीवर फारशी झुडुपें किंवा गवत वाढू देत नाहीं, तद्वत् उत्तम कवि आपल्या बाणीने वाचकांची मनें रिझवून त्यांना ज्ञानामृत पाजतात, सन्मार्गास लावितात. शोकाकुल किंवा संतप्त झालेल्या मनुष्यास शांति- सुख देतात. समाजास स्थिरता आणितात, त्यांच्यापुढे तुटपुंज्या ग्रंथकारांची लोकांत फारशी प्रतिष्ठा वाढत नाहीं. अशा श्रेष्ठ कवींचीं सुश्राव्य व रसाळ काव्यें वाचून मन उदात्त होतें ! परंतु अलीकडे काव्य वाचण्याची प्रवृत्ति दिवसेंदिवस कमी हो असून नीरस कादंबन्या व नाटके वाचण्याकडे लोक बहुतकरून आपला काळ खर्च करूं लागले आहेत. सारांश, दूध सोडून ताकावरच ते आपली तृप्ति करून घेत आहेत, असें हाटलें पाहिजे.
 गद्यापेक्षां पद्य पाठ करण्यास सुलभ असून, त्यांत थोड्या शब्दांत अर्थ- गांभीर्य किंवा रस-माधुर्य विशेष असतें. तसेंच तें मनोरंजक असून एकदां पाठ असलें ह्यणजे वाटेल त्या वेळी हाणून आपणांस त्यापासून करमणूक होते. सुरस व बोधपर कविता पाठ असल्या, ह्यणजे त्यांचा वर्तनावर इष्ट परि- णाम झाल्याशिवाय राहत नाहीं.
 येथवर काव्याची जी स्तुति केली आहे, ती उत्तम काव्या सच अनुलक्षून होय. काव्यांतही लावण्यांप्रमाणे कांहीं टाकाऊ व अश्लील काव्ये असतात, तीं न वाचणे चांगले. प्लेटोनें एके
 (६) ९७२ - २५०० १४-७-१००