पान:वाचन.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाङ्मय.

६९

 शास्त्रीय ग्रंथांविषयी येथे फारसें लिहिण्याचें कारण नाहीं. कारण त्यांत विवक्षित शास्त्रांविषयींच विचार केलेला असतो. त्या ग्रंथांतील विचार कठीण असल्यामुळे त्यांची भाषा व विषय- प्रतिपादनपद्धति हीं जितकीं सुलभ असतील तितकी चांगली. त्यामुळे ते ग्रंथ समजण्यास फारशी अडचण पडत नाहीं. अगो- दरच विषय दुर्बोध, आणि तशांत भाषासरणी व प्रतिपादन - पद्धति दुर्बोध असली कीं, मग ते ग्रंथ अधिकच कठिण होतात. अलिकडे अनेक उपयुक्त धंदे, कलाकौशल्यें या विषयांवर ग्रंथ तयार होऊं लागल्यामुळे या प्रकारची ग्रंथसंख्या बरीच वाढत चालली आहे.
 वाङ्मयाचे मुख्य भाग हाटले ह्मणजे काव्यें, कादंबन्या, नाटकें, चरित्रे, निबंध, टीकात्मक लेख इत्यादि होत. साधार- णतः वाळायाचे तीन विभाग करितां येतीलः -- ( १ ) कल्पना - त्मक ग्रंथ, (२) वर्णनात्मकग्रंथ व (३) टीकात्मक ग्रंथ. कल्पना- त्मक ग्रंथांचे मुख्य दोन भाग - काव्य आणि कादंबरी. काव्याचे दोन प्रकार असतात- श्राव्य आणि दृश्य दृश्य साधनांची मदत घेऊन स्वभाव, कृति व काव्य यांच्या द्वारे जनमनरंजनाचर जो प्रकार आहे, त्यास नाटक असें हाणतात, या कल्पनात्मक वाङ्मयाचा मुख्य उद्देश हाटला ह्मणजे वाचकांच्या किंवा प्रेक्ष- कांच्या मनांतील भिन्न वृत्ति प्रक्षुब्ध करून त्यांच्याद्वारें मनावर इच्छित परिणाम करण्याचा असतो. व तो ज्यास उत्तम साधतो त्यासच कवींत किंवा कादंबरीकारांत प्रमुखस्थान मिळतें,
 १. काव्य. -- कोणत्याही राष्ट्राच्या वाङ्मयाचा लक्ष्यपूर्वक शोध केल्यास असे आढळून येईल की, वाक्प्रयास प्रारंभ प्रथम काव्या- पासून होऊन नंतर त्यांत गद्यग्रंथ निर्माण होतात, वाद्भयांत