पान:वाचन.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५८
वाचनं.

होय. राष्ट्राच्या उन्नतीस वाङ्मय हैं जितकें कारणीभूत असतें, तितकी इतर कोणतीही दुसरी गोष्ट असूं शकत नाहीं. आज विसावें शतक लागले असून आपल्या देशांतील भिल्ल, कोळी, वारली, गोंड इत्यादि लोक अद्यापि अज्ञानांधकारांत का रहावे ? सुधारणेचा त्यांना गंधही कां नसावा ? याचे कारण हेंच कीं, वाङ्मयाशीं त्यांचा मुळींच परिचय नाहीं. जोपर्यंत ते लिहिणें वाचणें शिकणार नाहीत, तोपर्यंत त्यांची स्थिति हल्लीं आहे अशीच राहील ! हतकेंच नाहीं, तर ती उत्तरोत्तर वाईट होत जाईल! वाङ्मय हैं नदाप्रमाणे आहे. नदाचा उगम एखाद्या झऱ्यापासून असून पुढे त्यास अनेक ओढे व नद्या मिळाल्यामुळे तो प्रचंड होतो. तद्वत् वाङ्मयांतील ग्रंथसंख्या हळूहळू वाढत जाऊन पुढें प्रचंड ग्रंथभांडार होतें. वाङ्मयाची जी येवढी थोरवी वर्णिलेली आहे, या कारण हैं कीं, त्यापासून मनुष्यांतील आडदांडपणा कमी होऊन त्यांच्यांतील प्रेमाचा झरा वाढतो आणि समाजांत त्यांची उपयुक्तता अधिकाधिक वाढत जाते. लिहिणें वाचणें आ आणि स्वतंत्रपणे कार्यकारणभावाचा विचार करतां येऊं लागला, हणजे वाङ्मयरूपी सरस्वती मंदिराची किल्ली आपल्या ताव्यांत आली असें समजावें. मग या मंदिरांत प्रवेश करून तेथे सांठविलेल्या ज्ञानामृताचें सेवन करण्यास आपणांस मुळींच अडचण पडणार नाहीं. तेथील ज्ञानभांडार अमित असून त्या मानानें मनुष्यजीवित जरी अल्प आहे, तरी मनुष्यानें निराश न होतां वामनपंडितांची खाली लिहिलेली उक्ति ध्यानांत ठेवावी.

आकाश अंत न कळोनिहि अंतरिक्षीं ।
आकाश आक्रमिति शक्त्यनुसार पक्षी ||

आणि साध्य होईल तेवढें ज्ञान मिळविण्याची मुळींच हय- गय करूं नये.